आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी नाही केले मंत्र्यांचे स्टिंग : राधाकृष्ण विखे पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘दोन मंत्र्यांचे मी स्टिंग ऑपरेशन केले आहे. विधानसभेत ते सादर करीन,’ असे जाहीर करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी खळबळ उडवून दिली होती. पण २४ तासाच्या आतच त्यांनी घूमजाव केले. शुक्रवारी औरंगाबादेत ते म्हणाले, ‘स्टिंग ऑपरेशन मी केले नाही. कार्यकर्त्यांनी माझ्याकडे क्लिप दिल्या आहेत. त्याची शहानिशा करून वैधता तपासेन. नंतर विधानसभेत त्या मंत्र्यांचे वाभाडे काढेन.’ पत्रकारांनी त्यांना गाठून नेमके ‘ते’ मंत्री कोण अशी विचारणा केली. त्यावर विखे म्हणाले, ‘मी स्टिंग केलेच नाही, कार्यकर्त्यांनी केले आहे.