आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विलासराव पत्रकारांचे खरे मित्र’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विलासराव देशमुख पत्रकारांचे खरे मित्र होते, अशा शब्दांत औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. प्रमोद महाजन मराठी पत्रकार भवनात पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांना शुक्रवारी सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रारंभी निशिकांत भालेराव, नागेश गजभिये आणि स. सो. खंडाळकर यांनी विलासरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर काही पत्रकारांनी विलासरावांच्या अष्टपैलू जीवनावर प्रकाश टाकणारे विचार मांडले. दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, प्रमोद माने, माणिक साळवे, सुनील वाघमारे, शिवनाथ राठी यांच्यासह अन्य पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.