आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Mete News In Marathi, Shivsangram Sanghtana, Divya Marathi

शिवसंग्राम संघटना दोन दिवसांत महायुतीत; लवकरच घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आरक्षणाच्या मुद्दय़ावरून दोन्ही काँग्रेसकडून होत असलेल्या धूळफेकीच्या विरोधात येत्या दोन दिवसांत शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे पक्षासह महायुतीत सामील होऊन राष्ट्रवादीला हादरा देणार असल्याची माहिती भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.


दोन्ही काँग्रेस मराठा समाजाचा वापर करून सत्ता भोगत आहेत. मात्र, आरक्षण देण्याची वेळ येताच काहीतरी आश्वासने देऊन समाजाला धोका दिला जात असल्याचे मेटे यांनी लक्षात आणून दिले.
आरक्षणाच्या मागणीवरून मेटेंनी उभारलेले आंदोलन शांत करण्यासाठी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीने आरक्षणाबाबत स्पष्ट अहवाल दिला. मात्र, कृषिमंत्री शरद पवारांनी केवळ वेळकाढू धोरण सुरूच ठेवल्याने शिवसंग्राम संघटनेने महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रिपाइं नेते खासदार रामदास आठवले, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक व शैक्षणिक निकषावर मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा आक्षेप राहणार नसल्याचे महायुतीच्या सर्वच नेत्यांनी मान्य केले. म्हणूनच येत्या दोन दिवसांत विनायक मेटे महायुतीत सामील होऊन त्याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.