आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद तावडे एक काम करो, कुुर्सी छोडकर डान्स करो...भाजप मंत्र्यांविरुद्ध एबीव्हीपीचा एल्गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमारे निदर्शने केली. - Divya Marathi
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमारे निदर्शने केली.
औरंगाबाद- विनोद तावडे हमको पढने दो, देशको आगे बढने दो, विनोद तावडे एक काम करो कुर्सी छोडकर डान्स करो, अशा घोषणा देत भाजपची विद्यार्थी आघाडी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बुधवारी उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमारे निदर्शने करण्यात आली. उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या हकालपट्टीचीही मागणी परिषदेने केली. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे डॉ. माने यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही संघटनेने केला. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०१२ मध्ये झालेल्या पदभरतीत अपहार, भ्रष्टाचार केल्याप्रकरणी संचालक डॉ. माने यांना एप्रिल रोजी निलंबित केल्याची घोषणा तावडे यांनी विधानसभेत केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांचे निलंबन झाल्याचा निषेध करत अभाविपने आंदोलन केले. राज्यातील विविध सहसंचालक कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा इशारा देत, बुधवारी औरंगाबादमध्ये आंदोलन केले.
 
 या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहसंचालक डॉ. माने यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘विनोद की ‘धनराज’ के साथ जुगलबंदी’, ‘धनराज माने खुर्ची खाली करा’, अशा आशयाचे फलक हाती घेत कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली. आंदोलकांनी सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांना निवेदन दिले. या वेळी प्रदेशमंत्री राम सातपुते, महानगर सहमंत्री निखिल आठवले, शिवा देखणे, विवेक पवार, गजानन वाबळे, योगेश पवार, ईश्वर अष्टेकर, वैभव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
 
बातम्या आणखी आहेत...