आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाठायी खर्चामुळे विनोद तावडे यांनी विद्यापीठाला झापले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बेकायदेशीरपणे उत्तरपत्रिका खरेदीचे प्रकरण, ३५ लाखांच्या दोन कार आणि बीसीयूडी संचालकांच्या दालनाच्या नूतनीकरणावर झालेल्या अनाठायी खर्चाच्या संदर्भात राज्य शासनाला विद्यापीठाने स्पष्टीकरण सादर केले आहे. विधिमंडळात तारांकित प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी २४ जुलै रोजी ही माहिती विद्यापीठातून घेतली होती. कार खरेदी प्रकरणात तावडे यांनी झापल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले.

कुलसचिव आणि बीसीयूडी संचालकांना प्रत्येकी १८ लाखांच्या दोन होंडा कार खरेदी करण्यासाठी विद्यापीठ निधीतून काही महिन्यांपूर्वी ३६ लाखांचा खर्च करण्यात आला. त्याशिवाय बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांच्या दालनावर १५ लाखांचा अनाठायी खर्चही झाला. पूर्वी फक्त परीक्षा विभागाने केलेल्या ७३ लाखांच्या उत्तरपत्रिका खरेदीच्या प्रकरणासंदर्भात शासनाने अहवाल मागितला होता. आता मात्र कार आणि दालन यावरही विधिमंडळात चर्चा होण्याचे सुनिश्चित होते. आ. अमरसिंह पंडित यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, चिक्की घोटाळ्यावरील गोंधळावमुळे तो चर्चेला आलाच नाही. मात्र, तावडे यांनी १० जुलै रोजी मंझा यांच्याकडून माहिती घेतली होती. त्यानंतर तावडे यांनी उच्च तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्यामार्फत २४ जुलै रोजी विद्यापीठाकडे अहवाल मागितला होता.
खरेदीसाठी निर्देशांचे पालन करण्याची सूचना
परीक्षा विभागातर्फे डॉ. डी. एम. नेटके आणि इस्टेटतर्फे एका अधिकाऱ्यांनी तावडे यांना माहिती दिली. त्या वेळी तावडे यांनी आपण स्वत: मंत्री असताना सात लाखांचे वाहन वापरतो. मग आपण १८-१९ लाखांचे वाहन खरेदी कसे काय करता? असा सवाल केला होता. दालनाचे नूतनीकरण, बारकोडिंगच्या उत्तरपत्रिका खरेदीप्रकरणी तावडे यांनी अनाठायी खर्च केल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे तावडे यांनी संताप व्यक्त केला होता. कार खरेदीप्रकरणी शासनिर्देशांचे पालन करण्याची सूचनाही त्यांनी केली होती.
बातम्या आणखी आहेत...