आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हर्च्‍युअल की रिअँलिटी ? भाजपची द्विधा स्थिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एकीकडे मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत तरुणांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आकर्षित करायला निघालेल्या भाजपला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लावताना चार शब्द खडसावून सांगण्याची वेळ गोपीनाथ मुंडे यांच्यावर आल्याने पक्षातील अंतर्विरोध स्पष्ट झाला आहे. व्‍हर्च्‍युअल कम्युनिटी तयार करून हजारो जणांना जोडायला निघालेल्या भाजपला प्रत्यक्षात काम करण्यासाठी निमंत्रणाची वाट पाहणार्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळेच अधिक चिंता करावी लागणार आहे.

मंगळवारी भाजपची मराठवाडा विभागीय बैठक औरंगाबादेत झाली. त्यात भाजपने आपला मध्यमवर्गीय, मध्यमवयीन चेहरा बदलून त्याला तरुण रंगरूप देण्याचे जाहीर केले. त्यात व्‍हर्च्‍युअल कम्युनिटी तयार करणे, तरुणांचा सहभाग असणारी बूथबांधणी करणे यावर भर देण्यात आला आहे. राज्यात 82 हजार मतदान बूथ आहेत. या सर्व बूथसाठी यंत्रणा उभारताना युवक, युवती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाज यांना प्राधान्य द्या, असा संदेश मंगळवारच्या बैठकीत देण्यात आला.

भाजपमधील नेत्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी अशीच यंत्रणा केल्याने त्यांचा विजयाचा मार्ग खूप सोपा झाला. तसाच प्रयोग महाराष्ट्रात करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचा भाजपने निर्णय घेतला. त्यानुसार 10 हजार व्यक्तींना जोडणारी एक व्‍हर्च्‍युअल कम्युनिटी तयार करण्यात येईल. आज महाराष्ट्रात एकूण 11 कोटी 20 लाख मतदारांपैकी 7 कोटींहून अधिक मतदार तरुण आहेत. त्यामुळेच 18 ते 25 या वयोगटावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. असे असले तरी राज्यात सगळय़ा तरुणांना या माध्यमातून कसे जोडणार, हा प्रश्नच आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारखी शहरे वगळता इतरत्र खास करून ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण आजही खूप कमी आहे. अशा स्थितीत हायटेक यंत्रणा कशी कामाला येणार असा प्रश्नच आहे.

एकीकडे हायटेक धोरण आखले जात असले तरी प्रत्यक्षात व्यक्तिगत मानापमानामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करीत नसल्याचे खुद्द मुंडे यांना सांगावे लागले. पक्षात सन्मान मिळत नाही, जबाबदारी दिली जात नाही, अशी कारणे सांगण्याचा ट्रेंड आल्याचे ते म्हणाले.

असे का म्हणाले मुंडे ?
गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या प्रभावाखालील नेतेमंडळींचे मराठवाड्यात चालायचे. नंतरच्या काळात गडकरी गेले आणि मुंडेंच्या जवळचे फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर पक्षाच्या रचनेत फेरबदल झाले. त्यात बाजूला फेकल्या गेलेल्या भाजपच्या नेत्यांची अडचण झाल्याने त्यांनी गप्प राहणे पसंत केले. ही मंडळी कामाला लागली नसल्याचे मुंडे यांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्याने त्यांनी सर्वांना निमंत्रणाची वाट न पाहता कामाला लागण्याचा डोस दिला. मुंडे यांनी थेट कुणाचा नामोल्लेख करणे मात्र टाळले.

सोशल मीडिया ‘लाइक’वर चालतो
नव्या बदलांबाबत राजकीय निरीक्षक सारंग टाकळकर म्हणाले की, सोशल मीडियासोबतच जमिनीवरची यंत्रणा मजबूत हवी. भाजपचे विचार सोशल मीडियातून पोहोचतील की नाही याची शंकाच आहे. कारण सोशल मीडिया फक्त ‘लाइक’वर चालतो