आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’तर्फे ऑक्टोबरपर्यंत व्हर्च्युअल रिअल इस्टेट फेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात यावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे एक ऑक्टोबरपर्यंत व्हर्च्युअल रिअल इस्टेट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात साइट भेटीवर ‘दिव्य मराठी’तर्फे सोडत पद्धतीने एक भेटवस्तू मिळेल. शिवाय घराच्या बुकिंगवर बिल्डरकडून एक आकर्षक गिफ्टही मिळणार आहे.
केंद्र सरकारने नुकताच औरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासाच्या योजना राबवल्या जाणार आहेत. डीएमआयसी प्रकल्पात औरंगाबादचा समावेश आहेच. त्यात जगभरातील नामवंत कंपन्या त्यांचे कारखाने उभारणार आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक रोजगाराच्या निमित्ताने औरंगाबादेत येतील. त्यामुळे औरंगाबाद पुढील काळात खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवर चालणार आहे. ही बाब लक्षात घेऊन येथे घर असणे, अत्यंत महत्त्वाची बाब राहणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही औरंगाबादेत घर असल्यास पुढील पिढीसाठी त्याचा हमखास मोठा लाभ होणार आहे.

केंद्र राज्य सरकारने जीएसटी कायद्याला मंजुरी दिल्याने व्यापार, उद्योगाची भरभराट होणार असल्याचे अनेक उद्योजक, अर्थतज्ज्ञांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. शिवाय सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रक्कम येणार आहे. ती घरांमध्ये गुंतवल्यास लाभदायक ठरू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने व्हर्च्युअल रिअल इस्टेटचे आयोजन केले आहे. ग्राहकांना थेट साइटवर जाऊन घर, फ्लॅट पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

{अमृत डेव्हलपर्स : साइट: ए.एस. क्लबजवळ आणि रेल्वे स्टेशनजवळ, एमआयडीसी (संपर्क ९८२३२१६१४७, ९०११००३७४७, ९९२३०१७१४७, ९०११००३७४७)
{ओमप्लॅटिना : साइट: गट क्रमांक १७६, चाटे शाळेजवळ, सातारा परिसर (संपर्क : ८४०७९३५५५५, ८४०७९२५५५५, ९०४९९९३७७७)
{ग्रँडकल्याण : साइट: गंगामाईनगर, वाल्मी गेटसमोर, कांचनवाडी, पैठण रोड (संपर्क ८८८८८८२६२७, ८८८८८८२६२८)
{वरदलक्ष्मीइंटरप्रायजेस : साइट: झाल्टा फाटा, बीड बायपास, आडगाव (बु.) (संपर्क : ९९२३७४४३८३, ९८६००२७२२१)
{राठीकन्स्ट्रक्शन : साइट: काल्डा कॉर्नर, एनएक्स (संपर्क : ९५४५३६३१११, ९३७१३६०५००)
{सूरजबिल्डर्स : साइट: शेंद्रा एमआयडीसी (संपर्क : ९६७३३९००००)
बातम्या आणखी आहेत...