आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- आसाममधील वाद हा स्थानिक बोडो नागरिक आणि घुसखोर बांग्लादेशी यांच्यातील आहे. मात्र त्याला जातीय आणि धार्मिक रंग देणे दुर्दैवी असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री चंपतराय यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या वेळी चंपतराय म्हणाले की, केंद्र सरकार देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत आहे. आसाममध्ये घडणार्या घटना त्याचे उदाहरण आहे. तेथील स्थानिकांना स्वत:च्या संरक्षणासाठी प्रत्युत्तर द्यावे लागत असल्याचेही ते म्हणाले. हे घुसखोर भारताची भौगोलिक सीमारेषा बदलण्यासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्मथन योग्य ठरणार नसल्याचेही चंपतराय म्हणाले. आगामी काळात आसाममध्ये राहणार्या नागरिकांना कपडे, चादरी, भांडे आदी दैनंदिन वस्तूंची गरज भासणार आहे. त्यामुळे देशभरातून मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
काश्मीरप्रश्नी प्रशासनाने नेमलेल्या वार्ताकारांचा अहवाल विभाजनाला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद या अहवालाचा जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले, तर 60 वर्षांपासून रखडलेल्या रामजन्मभूमीच्या प्रश्नावर सरकार आणि संसदने गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. अण्णा हजारेंचा राजकारण प्रवेशाचा निर्णय अजून प्राथमिक अवस्थेत आहे; पण त्यांनी सुरू केलेल्या देशातील तरुणांमध्ये देशसेवा रुजण्यास सुरुवात झाल्याने, त्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. या वेळी औरंगाबाद जिल्ह्याचे प्रमुख राजेश जैन, प्रसिद्धिप्रमुख अखिल जैन आणि भारतीय युवा मोर्चाचे सतीश छापेकर यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.