आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाकवर कारवाईची संधी गमावू नये’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने लष्कराला पाकिस्तानबाबत कारवाईचे अधिकारही दिले आहेत. यापूर्वी आंतरराष्ट्रीय दबावामुळे अशी स्थिती नव्हती. मात्र आता पाकिस्तानवर कारवाईची संधी भारताने गमावता कामा नये, असे परखड मत सामरिक, परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक शेषाद्री चारी यांनी व्यक्त केले आहे. दिवंगत अॅड. विष्णूपंत अदवंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
तापडिया नाट्य मंदिरात शनिवारी चारी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. माणिकचंद पहाडे महाविद्यालय आणि मराठवाडा लीगल जनरल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर प्राचार्य सी. एम. राव, आर. डी. देशपांडे यांची उपस्थिती होती.

सिंधूनदीच्या पाण्याचे फेरवाटप गरजेचे : चारीपुढे म्हणाले की, सिंधू नदीचे पाणी वाटप धोरण बदल्याची गरज आहे. आजही सिंधू नदी ८२ टक्के पाणी पाकिस्तानला मिळते तर भारत फक्त १८ टक्के वापरतो. आजही नदीच्या प्रवाहात भारत पाकिस्तानच्या परवानगीशिवाय कुठेही बांध वा धरण बांधू शकत नाही. त्यामुळे आमच्या देशात वाहणाऱ्या नदीवर आम्ही काहीच करू शकत नाही. पाकिस्तानमध्येही सिंधू नदीचे पाणी सिंधमधील लोकांना देण्याऐवजी ते इस्लामाबाद, पाकव्याप्त पंजाबमध्ये वापरले जात असल्यामुळे सिंधमध्येही संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९७१ मध्येच भारताने सिंधू नदीच्या पाण्याचे फेरवाटप केले असते तर पाकिस्तानला आपण त्याच वेळी वाकवू शकलो असतो. आज किमान धरण बांधायचे म्हटले तरी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागेल.

पाकसोबतचा आर्थिक व्यवहार कमी करावा : भारत-पाकमधीलसंबंध कुटनीतिक, लष्करी आणि आर्थिक स्वरूपाचे आहेत. भारताने १९८६ मध्ये पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा दिला. मात्र पाकिस्तानने भारताला हा दर्जा गेल्या २० वर्षांतही दिला नाही. बिघडलेल्या संबंधाचा परिणाम म्हणून आर्थिक सहभाग वाढायला हवा तोही होत नाही. त्यामुळे भारताने आर्थिक व्यवहार कमी करावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. भारताला पूर्वेकडील श्रीलंका, भूतान, बांगलादेश, नेपाळ, चीन, हांॅगकांॅग, तैवान या देशाशी आर्थिक संबंध वाढवता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. लष्करी पातळीवर पाकिस्तानने भारतासोबत लढण्याचे प्रयत्न केले त्या वेळी म्हणजे १९६५, १९७१ आणि कारगिलमध्ये पराभव झाला आहे. यूएनमध्येही डिप्लोमॅटिक परिस्थितीतही त्यांची अडचण झाली, असेही चारी यांनी सांगितले.

धर्मचसमाजाला एकत्र ठेवू शकतो : यापूर्वीतापडिया नाट्य मंदिरातील व्याख्यानात ते म्हणाले की, धर्मच समाजाला एकत्र ठेवू शकतो. परंपरा लोकांना एकत्र करण्याचे प्रयत्न करतात. मात्र कालांतराने त्या बदलत असतात. त्यामुळे समाजामध्ये एकत्रित ठेवण्याचे काम धर्माच्या माध्यमातूनच केले जाते. या वेळी त्यांनी हिंदू म्हणजे काय, त्याची केलेली व्याख्या, कोणाला हिंदू म्हणावे या प्रवासाबद्दल त्यांनी माहिती दिली. प्रत्येकाच्या उपासनेच्या पद्धती वेगळ्या आहेत. मात्र धर्म म्हणजे सत्य. धर्माच्या बाबतीत प्रत्येकाचे समज गैरसमज असल्याचे चारी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा कांबळे यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...