आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांगरे पाटलांच्‍या पत्‍नी आहेत मराठवाड्याच्या, विश्‍वास यांना \'खाकी\'त पाहून झाल्‍या होत्‍या \'इम्प्रेस\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एक कर्तव्यतत्पर पोलिस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रातील तरुणाईपुढेही ते आदर्श आहेत. युवकांना मार्गदर्शन करण्‍यासाठी त्‍यांनी लिहीलेल्‍या 'मन मे है विश्वास' या पुस्‍तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. अवघ्या काही दिवसात या पुस्‍तकाच्‍या तीन आवृत्त्या आल्याने पुस्तक विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. विश्‍वास यांच्‍या आयुष्‍यात त्‍यांच्‍या पत्नी रुपालीताई यांचे सहकार्य, पाठिंबाही मोठा आहे. नवऱ्याची मैत्रीण, सहकारी म्हणून सक्षमपणे त्‍या आपली भूमिका पार पाडतात. या संग्रहात जाणून घेऊया विश्‍वास नांगरे पाटील व रुपालीताई यांच्‍याविषयी काही खास बाबी.
विश्‍वास यांना औरंगाबादने दिले वेगळे वळण..
विश्‍वास नांगरे पाटील यांचे करिअर व वैवाहिक जीवनाची सुरूवातच औरंगाबादेतून झाली. आयपीएस झाल्यावर 1999 मध्ये त्यांची प्रोबेशनवर पहिली बदली औरंगाबाद जिल्ह्यात झाली. फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड या विभागात त्यांनी काम केले. कन्नडचे कल्याण औताडे यांच्याशी विश्‍वास यांची मैत्री झाली. त्यांनीच पद्माकर मुळे यांची मुलगी रूपालीताई हिच्या लग्नाचा प्रस्ताव आणला होता. कल्याण औताडे यांनी मुळे कुटुंबीयांशी बोलणी करून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चित केला. विश्वास त्‍यांच्‍या मित्रांसोबत मुलगी बघायला गेले.
दोनदा झाला मुलगी बघण्‍याचा कार्यक्रम..
मुलगी बघण्‍याच्‍या कार्यक्रमात रुपालीताई यांना काही वेळच विश्‍वास यांच्‍या समोर येता आले. त्‍यामुळे पहिल्‍या भेटीत या दोघांमध्‍ये फार बोलणे झाले नाही. पाहण्यासाठी चौघे आलेले असल्यामुळे नेमका मुलगा कोणता, असा प्रश्न रूपालीताई यांना पडला होता. यामुळे पुन्हा दुसर्‍या दिवशी भेटण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार रूपालीताई एका नातेवाइकासोबत कॅफे हाऊसमध्ये भेटण्यासाठी आल्या. या वेळी दोघांनी तब्बल तासभर चर्चा केली.
वडिलांचा विरोध मावळला..
नांगरे पाटील यांच्या वडिलांना मराठवाड्यातील मुलगी मान्य नव्हती. कोल्हापूर, सांगली किंवा सातार्‍याची मुलगी सून म्हणून आण, असा खाक्याच त्यांनी दिला होता, पण अखेर विश्वास यांच्या पसंतीला मान देत वडिलांनी लग्नाला होकार दिला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, रुपालीताई आहेत बेस्‍ट होममेकर,
विश्‍वास यांना युनिफॉर्म'मध्ये पाहून रुपालीताई झाल्‍या होत्‍या 'इम्प्रेस'
.., असे जुळले लग्‍न..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...