आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठुमाउलीच्या चरणी भक्तांचे वरुणाला साकडे : विध्‍यार्थ्‍यांनी दिला सामाजिक संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - आषाढी एकादशीनिमित्त २७ जुलै रोजी शहरातील विविध मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. दिंड्या काढल्या. विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी | होतो नामाचा गजर दिंड्या पताकाचा भार, असा विठ्ठलाचा जयघोष करत टाळ, मृदंगाच्या गजरात पावली, फुगड्या खेळल्या. यानिमित्त चिमुकल्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून "झाडे लावा झाडे जगवा'चा संदेश दिला.
विठ्ठल मंदिरांत दुपारनंतर गर्दीचा ओघ वाढला ; शहरातून छोट्या पंढरपूरकडे अनेक दिंड्यांनी केले प्रस्थान
सिद्धार्थउद्यान येथील दिव्य योग साधना ग्रुप आणि समर्थनगरचे नगरसेवक ऋषिकेश खैरे यांच्या वतीने सोमवारी २७ जुलै रोजी सकाळी विठ्ठलाची आरती आणि भजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने समर्थनगर येथील बजरंग व्यायामशाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. नगरसेवक ऋषिकेश खैरे यांच्या हस्ते आरती करून उपस्थित नागरिकांना खिचडी आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. या वेळी शामसुंदर गट्टाणी, अॅड. विठ्ठलराव कुंटे, श्रीकृष्ण तांबे, सुधीर जाधव, भूपेश पाटील, अनिल मकरिये, गणेश वाघ, अनिल खंडाळकर, आनंद तांदुळवाडीकर, जितेंद्र शिंदे आणि नागरिकांची उपस्थिती होती.
"पुंडलिकवरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय...'
असाविठुरायाचा जयघोष करत या भक्तांनी आषाढी एकादशीला दुष्काळ दूर करण्यासाठी भरपूर पर्जन्यवृष्टी होऊ दे, असे साकडे विठ्ठलाला घातले. शहरातील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांत भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. नवीन कपडे, कपाळी बुक्का आणि टिळा लावून भाविक दिवसभर दर्शनासाठी मंदिरात जाताना दिसले. गजानन मंदिर आणि नाथमंदिरासह इतर मंदिरांतही दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. तसेच मंदिरात प्रसाद आणि खिचडीचे वाटप करण्यात आले.

सकाळी सुरू झालेल्या दर्शनाच्या रांगा दुपारी काहीशा कमी झाल्याचे चित्र होते. परंतु संध्याकाळी पाच वाजेनंतर पुन्हा रांगा वाढल्या होत्या. गजानन महाराज मंदिरामध्ये गारखेडा परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले.

तसेच शहरातील विविध मंदिरांत धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील अनेक दिंड्यांनी छोट्या पंढरपुराकडे पायी प्रस्थान केले. विठ्ठलनगर, चिकलठाणा, बजरंग चौक, किराडपुरा आदी भागांतील मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिरे आकर्षक दिसत होती. सातारा परिसरातील मंदिरांमध्ये सातारावासीयांनी गर्दी केली. आषाढी एकादशीचे औचित्य साधून तरुणांचे ग्रुप, राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी ठिकठिकाणी पाणी पुरवणे, चहा-कॉफी तसेच फराळाचे वाटप करण्यासाठी स्टॉल लावले होते. अनेक सामाजिक संघटनांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेत परिसरातील कचरा उचलून स्वच्छता ठेवण्याचे काम केले. यामध्ये अनेक भक्तांनी सहभागी होत स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

विष्णूनगर येथील रहिवासी राधाकृष्ण गायकवाड यांच्या वतीने मोंढानाका उड्डाणपूल येथे भाविकांना फराळाचे आिण खिचडी वाटप करण्यात आली. छाया : अरुण तळेकर, मनोज पराती, रवी खंडाळकर.

चिकलठाणा येथील नरेंद्र महाराज भक्ती मंडळाच्या वतीने छोट्या पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंडीत डोक्यावर कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.
आषाढी एकादशीनिमित्त स.भु.प्राथमिक विभागाच्या लहान मुलांनी वृक्षदिंडी काढली होती. चिमुकल्या मुलींनी पारंपरिक वेशभूषा करत "झाडे लावा झाडे जगवा'चा संदेश दिला.
धावणी मोहल्ला येथे विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इन्सेट : धावणी मोहल्ला येथील मंदिरातील विठ्ठल- रुख्मिणीची मूर्ती.

रांगोळीतून साकारले विठ्ठलाचे रूप
१. आषाढी एकादशीनिमित्त मुकुंदवाडीतील रहिवासी मंजिरी थेटे यांनी रांगोळीतून विठुरायाचे रूप साकारले आहे. २. सेंट अॅन्स हॉस्पिटल येथील डॉ. प्रिया पाटील यांनी विठ्ठलाची मूर्ती रांगोळीतून रेखाटली. ती फूट लांब आणि फूट रुंदीची असून काढण्यासाठी त्यांना तास कालावधी लागला.

अशी झाली विक्री (क्विंटलमध्ये)
रताळे१२००
बटाटे ८००
केळी १०००
डाळिंब ३००
भुईमुगाच्या शेंगा २००
पपई २१०

पाळणे आणि झोक्यांनी मंदिर परिसर सजले
शहरातीलकाही नावाजलेल्या मंदिराच्या बाहेर लहान मुलांसाठी छोटे पाळणे, झोके तसेच साहित्य विक्रीचे स्टॉल लागले होते. त्यांची विक्रीही जोरात सुरू असल्याने शहरात बऱ्याच ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते.

फळांची मोठी उलाढाल
एकादशीनिमित्तबाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. फळांच्याही किमती दोन दिवसांसाठी काही प्रमाणात वाढलेल्या होत्या. बटाटे आणि रताळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटचे संतोष गायकवाड यांनी सांगितले. दरवर्षीपेक्षा यंदा साबुदाणा आणि भगरीची केवळ दहा टक्केच जास्त विक्री झाल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी सांगितले.

सिद्धार्थ गार्डनमधील दिव्य योग साधना ग्रुप आणि नगरसेवक ऋषिकेश खैरे यांच्या वतीने सोमवारी समर्थनगर येथील बजरंग व्यायाम शाळेच्या प्रांगणात विठ्ठल रुख्मिणी यांची आरती करण्यात आली. आणि फराळाचे वाटप करण्यात आले.
संस्कार बालक मंदिर
संस्कारबालक मंदिर प्रशालेने ढोल, ताशाच्या गजरात दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत पावली खेळत गोल रिंगण करून फुगड्यांचा आनंद लुटला. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पांडे, विशाल ठेंग, बाप्ू साबळे, दीपक मिरगे, रिना हिवाळे, करुणा कुलकर्णी, सोनाली काकडे, प्रतिभा वनारसे, दीपाली कडेठाणकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
फोटो ओंकार नावाने आहे.

ओंकारविद्यालय
ओंकारविद्यालयाने सकाळी वाजता क्रांती चौक ते एसएससी बोर्डमार्गे अहिल्याबाई होळकर चाैक मार्गे कर्णपुरा मंदिरापर्यंत पायी दिंडीचे आयोजन केले. दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी विविध सामाजिक विषयांवर संदेश िदला. दिंडीच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेतून मुलांनी जनजागृतीच्या हेतूने घोषवाक्य, फलक तयार केले हाेते.

नाथअकॅडमी
हर्सूलपरिसरातील नाथ अकॅडमी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीतून विठ्ठल नामाचा गजर तसेच भक्तिगीते सादर करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयराज देवरे, मुख्याध्यापिका कल्पना हिरे यांनी वृक्षारोपण केले. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रीन डे साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन प्रिया जाधव यांनी, तर आभार खरात यांनी मानले.

मुर्डेश्वरविद्यालय
विद्यार्थ्यांनीवारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढण्यात आली. विठ्ठल- रुख्मिणीच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक टी. एस. तायडे यांनी केले. दिंडींतून "झाडे लावा झाडे जगवा'चा संदेश देण्यात आला. दिंडी शाळेत परल्यानंतर विद्यार्थ्यांनी भजन, भक्तिगीत,भारूड गीतगायनाचा कार्यक्रम सादर केला.
गणपतरावजगताप विद्यामंदिर
शाळेतीलविद्यार्थी वारकरी वेशभूषेत वृक्षदिंडीत सहभागी झाले होते. परिसरातील नागरिकांना वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले, तसेच हरिनामाच्या जयघोषाने परिसर गजबजून गेला. विठ्ठल- रुख्मिणीच्या वेशभूषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. वृक्षदिंडीची सांगता शाळेच्या प्रांगणात करण्यात अाली. याप्रसंगी मुख्याध्यापक राकेश गांगुर्डे यांनी विठुरायाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी के. डी. वनारसे, डी. डी. बिरादार, के. व्ही. नागे, एस. एस. पाटील,व्ही. एस. मुंढे, बी. पी. मलवाड, व्ही. एन. खाेमणे यांनी परिश्रम घेतले.

राधाकृष्णविद्यालय
आषाढीएकादशीनिमित्ताने दिंडी काढण्यात आली.वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत विद्यार्थी आणि लेझीम पथक तसेच पताका घेऊन घोषणा देऊन वृक्षदिंडी काढण्यात अाली. या वेळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका एस. आर. गादीमोड, मुख्याध्यापक जी. के. हरकळ यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन एस. एस. इंगळे यांनी तर आभार ए. बी. गायकवाड यांनी मानले.

पंखलर्निंग प्री-प्रायमरी स्कूल
आषाढीएकादशीनिमित्त बालगोपाळांनी “बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवेभावे” असा जयघोष करत दिंडीत सहभाग नोंदवला. प्रसंगी दिंडीत विठ्ठल -रुख्मिणी, संत तुकाराम, संत नामदेव, वारकरी सर्व संतांच्या पोशाखासह तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठुनामाचा गजर करत बालगोपाळ सहभागी झाले होते. प्रसंगी श्रेयनगर ते अष्टविनायक मंिदर अशी दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उज्ज्वल जहागीरदार, शीतल वर्मा, सुखदा मेहता, पूजा पारख यांनी परिश्रम घेतले.