आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक निवडणुकीची आज मतमोजणी, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार असून या मतमोजणीसाठी रविवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपायुक्त, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले.प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.  

चिकलठाणा येथील कलाग्रामसमोरील मराठवाडा रिअेलेटर्स प्रा. लि. येथे सकाळी वाजता सुरू होईल. त्यासाठी मतमोजणीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळी वाजता आपल्या शासकीय ओळखपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे. त्याचबरोबर मजमोजणी ठिकाणी मोबाइलचा वापर करता येणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहनाची व्यवस्था कलाग्राम येथे करण्यात आली असून शासनाने दिलेल्या आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या. निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांनी मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची बाब असून प्रक्रिया समजून घेऊन पार पाडावी, असे आवाहन केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त महेंद्र हारपाळकर यांनीही महत्त्वाच्या सूचना केल्या.