आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नावनोंदणीसाठी मोहिमेच्या पहिल्या दिवशी गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभेला तरी आपल्याला मतदान करता यावे, मतदानापासून वंचित राहण्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या मतदार नोंदणीला सोमवारी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी झाली होती. विशेष म्हणजे आयोगाने एसएमएस सुविधा दिल्याने नव्याने अर्ज करणार्‍यांनी आपला मोबाइल क्रमांक अर्जात नमूद करावा, असे आवाहन निवडणूक शाखेने केले.
लोकसभा निवडणुकीत अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. अनेकांची नावे अर्ज भरूनही यादीत समाविष्ट करण्यात आली नव्हती. तर, काहींची असलेली नावेच कुठलीही पूर्वसूचना न देता वगळण्यात आली होती. त्यातून धडा घेत आयोगाने यंदा मोबाइल एसएमएस अलर्ट सुविधा सुरू केली आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या यादीतील कुठलेही नाव वगळण्यात येणार नसून, केवळ नव्याने नावे नोंदली जातील.
नावात अथवा पत्त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची नावे मागील निवडणुकीत होती त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. अर्ज सादर करताच त्याची ऑनलाइन डाटा एन्ट्री केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज जमा केल्यानंतर सात ते 10 दिवसांत मतदारांना आपले नाव आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. मतदार यादीत त्याचा समावेश झाला नसल्यास त्याचे कारण तेथे असेल, तर समाविष्ट झाले असल्यास तेही नमूद केले जाणार आहे. त्यामुळे मतदारांची धावपळ कमी होणार आहे.