आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात 13 हजार मतदार वाढले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषद गटांच्या मतदार संख्येमध्ये वाढ झाली असून 1 जानेवारी 2005 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या 13 लाख 78 हजार इतकी होती. त्यानंतर प्रक्रियेनुसार मतदारांची नोंदणी सुरू होती. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 13 हजार मतदारांची भर पडली आहे.
जिल्ह्यातील 9 तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या 60 गटांमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असून अर्ज विक्रीला आणि एबी फ ॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे. 23 जानेवारीपर्यंत अर्ज विक्री सुरू राहील. मतदार संख्या वाढली असली तरी मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी सर्वांनाच कष्ट घ्यावे लागणार आहेत.
मतदार वाढविण्यासाठी निवडणूक विभागाची कार्यवाही सुरू होती. 2011 च्या लोकसंख्येनुसार नव्या मतदार नोंदणीत जिल्ह्यात एकूण 13 लाख 93 हजार 267 मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे मागील मतदारांमध्ये 13 हजारांची संख्या वाढली.