आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार याद्यांशी कार्ड संलग्नतेत कन्नड अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - भारतीय निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेल्या मतदार याद्यांचा शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रम देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत प्रथम मतदारांचा आधार क्रमांक मतदार याद्यांशी जोडण्यात येत आहे. यामध्ये कन्नड तालुका आघाडीवर असून राज्यात १६ व्या स्थानी, तर जिल्ह्यात अव्वलस्थानी आहे.
कन्नड १०५ विधानसभा मतदारसंघात २ लाख ७८ हजार मतदारांपैकी सद्य:स्थितीत १ लाख ६ हजार मतदार आधार क्रमांकाशी जोडलेले आहेत. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये कन्नड तालुका १६ व्या क्रमांकावर, तर जिल्ह्यात अव्वल आहे. रविवारीही मतदार याद्यांशी आधार कार्ड संलग्न करण्याचे काम करण्यात येत आहे. विशेषत: या दिवशी केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर थांबून आधार क्रमांक संलग्न करत आहेत. मतदार याद्यांच्या शुद्धीकरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त मतदारांनी आपले आधार क्रमांक मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजीव नंदकर यांनी केले.
असा नोंदवता येईल आधार क्रमांक
मतदारांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक व ओळखपत्र क्रमांक भरण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या https: // ceo.nic.in या संकेतस्थळावर national voters services portal उपलब्ध करून दिले आहे. तसेच १९५० या टोल फ्री नंबरवर नोंदवू शकता. याशिवाय मतदारांना फोन करून आपला आधार कार्ड क्रमांक ५१९६९ या क्रमांकावर एसएमएस करून नोंदवता येईल. यात एसएमएस सुविधेसाठी ECILINK < EPIC Number > हा एसएमएस ५१९६९ वर पाठवा. संकेतस्थळावर आधार नंबर भरणे. यात ECI-NVSP मतदार यादीत नाव शोधा व आपला आधार नंबर भरा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात मतदार मदत केंद्रात आधार कार्डची झेरॉक्स जमा करावी.
तालुकानिहाय स्थिती
पैठण २,००,०००
औरंगाबाद ८,१५,३५२
सिल्लोड २, ८४, ३०२
गंगापूर २,६२,१७७
कन्नड २,५३,४११
वैजापूर २, ४२,२९३
फुलंब्री १,२४,२१५
खुलताबाद ६०,४६५
सोयगाव ५१,६१२
बातम्या आणखी आहेत...