आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voter Registration Started Issue At Aurangabad, Diyva Marathi

मतदार नोंदणीसाठी आयोग पुन्हा जनतेच्या दारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारपासून (29 मे) सर्वत्र मतदार नोंदणी सुरू झाली. गतवेळी मतदार याद्यातील नावे गाळण्यावरून गहजब झाला होता. या वेळी तसा प्रकार होऊ नये म्हणून आयोगाकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार असून येत्या 16 जूनपासून प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी आयोगाचे कर्मचारी (बीएलओ) कार्यालयीन वेळेत हजर राहणार आहेत. त्यांच्याकडे नवीन नावनोंदणी, जुन्या नोंदणीत नावात दुरुस्ती, पत्त्यात बदल यांचे अर्ज मिळतील आणि ते स्वीकारलेही जातील.
19 ते 30 जून असा या अभियानाचा कालावधी असल्याचे सांगण्यात आले असले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अभियान 9 जूनपासून सुरू होऊ शकते. जुन्या तसेच नव्या मतदारांना यादीत नाव नोंदणीसाठी सर्व त्या संधी मिळायला हव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात सद्य:स्थितीत (जेथे लोकसभेला मतदान झाले) 2577 मतदान केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी 16 जूनपासून सर्व अर्जांसह कर्मचारी उपस्थित राहतील. नव्या मतदारांसाठी वयाचा पुरावा, निवासाचा पत्ता व ओळखपत्राची प्रत एवढी कागदपत्रे मतदार नाव नोंदणीसाठी लागतात. सोबत दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक आहेत.