आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणीसाठी शिवसेनेचे शिबिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना पश्चिम विधानसभा मतदारसंघाद्वारे मतदान नावनोंदणी शिबिर घेण्यात येत असून आवश्यक कागदपत्रांसह मतदारांनी खाली दिलेल्या स्थळावर आणि तारखेस मतदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहरप्रमुख राजू वैद्य यांनी केले आहे. मतदार नोंदणीसाठी जन्मतारखेचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/ दहावी प्रमाणपत्र/ महापालिका किंवा ग्रामपंचायतीकडून प्राप्त जन्मदाखला) किंवा सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र यांच्या प्रमाणित प्रती, तसेच स्वत:चा फोटो, रहिवासी प्रमाणपत्र (टेलिफोन बिल, वीज बिल, बँक पासबुक, नवविवाहितांसाठी विवाहपत्रिका तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र) या आवश्यक प्रमाणपत्रांसह खालील ठिकाणी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत भेटावे.
12 जूनला रेणुकामाता मंदिर परिसर, झांबड इस्टेट, श्रेयनगर, 13 जून- शिवहनुमान मंदिर, शिवशंकर कॉलनी, 14 जून- मोरोपंत पिंगळे सभागृह, ओंकारेश्वर मंदिरामागे, रामायणा हॉलसमोर, जवाहर कॉलनी, 15 जून- महापालिका सभागृह, महात्मा फुले हायस्कूलसमोर, रचनाकार कॉलनी, रेल्वेस्टेशन मार्ग, 16 जून - मनपा बालक मंदिर, पदमपुरा, 17 जून- मोहटादेवी मंदिराजवळ, बजाजनगर, 20 जून- जागृत हनुमान मंदिर, 11 वी योजना, 21 जून- उद्योग आयकॉन, ओअ‍ॅसिस चौकासमोर, राजपूत पेट्रोलपंपाशेजारी, पंढरपूर, 22 जून- श्रीराम मंदिर, उस्मानपुरा, 23 जून- राधा मंगल कार्यालय, आमदार रोड, सातारा परिसर, 24 जून- नंदकुमार घोडेले यांचे संपर्क कार्यालय, संताजी पोलिस चौकीसमोर, नक्षत्रवाडी, 25 जून- मुंबई बाजार, पडेगाव आणि 26 जून- विठ्ठल-रखुमाई मंदिर, भावसिंगपुरा येथे नागरिकांनी यावे. अधिक माहितीसाठी आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.