आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळीतून मतदारांमध्ये जनजागृती, कलाशिक्षक राजेंद्र वाळके यांचा अनोखा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच मतदारांनी येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजवावा. यासाठी रांगोळी व घोषवाक्याच्या माध्यमातून मतदारांत जनजागृती करण्याचा वसा सिडको येथील विनायकराव पाटील प्राथमिक शाळेचे कलाशिक्षक राजेंद्र वाळके यांनी घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत शहरातील विविध महाविद्यालय, शासकीय कार्यालय, मंदिर अशा ठिकाणी रांगोळी काढून मतदारांत जनजागृती करत आहेत.

सिडको येथील विनायकराव पाटील प्राथमिक शाळेचे कलाशिक्षक राजेंद्र वाळके यांनी रांगोळीच्या माध्यमातून आतापर्यंत पर्यावरण, पाणी वाचवा, स्त्री भ्रूणहत्या, एड्स, शिक्षण, वाढती लोकसंख्या, गारपीट या ज्वलंत विषयाची दांभिकता मांडली. तसेच 26/11 मधील शहिदांचे शहरात विविध ठिकाणी ते रांगोळीच्या माध्यमातून चित्रे रेखाटत दरवर्षी श्रद्धांजली अर्पण करतात. सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मतदानापासून कुणीही वंचित राहू नये, संविधानाने गोरगरीब व श्रीमंतांसह सर्वांना समान दिलेला मतदानाचा हक्क बजवावा, त्यांची आठवण करून देण्यासाठी तसेच प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी शासनाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. 5 ऑक्टोबरपासून शहरातील विविध भागांत मतदारांमध्ये जनजागृती करत आहे. एक दिवस मतदानासाठी... लोकशाहीच्या िहतासाठी, मी मतदान करणार...तुम्ही पण मतदान करा, आमचे कर्तव्य, आमची जबाबदारी...मतदान करणार, आजची तरुणाई, राज्य माझे, मी राज्याचा हक्क आमुचा मतदानाचा आणि सारे काम छोड दो, सबसे पहले वोट दो असे घोषवाक्यदेखील त्यांनी रांगोळीत रेखाटून नागरिकांना मतदान करण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यांनी काढलेल्या या रांगोळीचे अनेकांनी कौतुकदेखील केले आणि मतदान करण्याचा निर्धार केला आहे.