आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैसे मिळवून दिले तरच मतदान, केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष समितीची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काबाडकष्ट करत माता-भगिनी व बांधवांनी केबीसीमध्ये पुंजी गुंतवली. तो पैसा असाच सोडणार नाही. ज्या राजकीय पक्षाला सत्ता हवी आहे त्याने परळी वैजनाथ येथे ७ ऑक्टोबरला होणाऱ्या केबीसी महामेळाव्यात येऊन केबीसी पीडितांचा प्रश्न मार्गी लावण्याचे जाहीर करावे. त्याच पक्षाला मतदान केले जाईल. दिवाळीपूर्वी कष्टकऱ्यांचा पैसा परत करण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. कुठल्याच राजकीय पक्षाने दखल घेतली नाही तर मतदानावर बहिष्कार टाकू, अशी घोषणा केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष करण गायके यांनी केली. छावा मराठा संघटना, महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, शिवक्रांती सेनाप्रणीत केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (२२) संत एकनाथ रंगमंदिरात महामेळावा घेण्यात आला.
पंकजा मुंडेंनी दखल का घेतली नाही?

गोपीनाथ मुंडे यांनी सर्व समाजाला न्याय मिळावा यासाठी जिवाचे रान केले. मात्र, पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रेत केबीसी पीडितांबद्दल एक शब्दही उच्चारला नाही की, साधी विचार पूस केली नाही. विदर्भ वेगळा करू इच्छिणारा भाजप केबीसीपीडित दहा लाख नागरिकांच्या प्रश्नाबद्दल उदासीन का आहे, असा सवालही महामेळाव्यात उपस्थित करण्यात आला.