आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात 1400 मतदारांमागे एक केंद्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मतदारांची संख्या वाढल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या 168 ने वाढवण्यात आली आहे. आता मतदार केंद्र संख्या 2568 इतकी झाली असून याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरी भागात 1400 तर ग्रामीण भागात 1200 मतदारांमागे एक केंद्र असणार आहे.

नवीन केंद्रांची मागणी करणे किंवा केंद्र हलवणे किंवा जुने केंद्र बंद करण्याच्या मागणीसाठी 23 जुलैपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकार्‍यांच्या कार्यालयात या मतदान केंद्रांची यादी नागरिकांना बघता येणार आहे.

कशासाठी घेता येतो आक्षेप : मतदान केंद्रांची जागा बदलणे, नवीन मतदान केंद्रांची मागणी करणे. विद्यमान केंद्र बंद करणे यासाठी कारण मात्र द्यावे लागते. यासाठी तहसील कार्यालयात आक्षेप नोंदवल्या जाऊ शकेल.

वाढू शकतात मतदान केंद्रे : नागरिकांनी विद्यमान केंद्रांना आक्षेप घेऊन सबळ कारण पुढे केल्यास नवीन केंद्र सुरू करण्याची तरतूद आहे. त्यामुळे अंतर लांब पडण्याबरोबरच अन्य काही कारणे दिली गेली तर नवीन केंद्र सुरू केले जाऊ शकते. आज यादी प्रसिद्ध झाल्याबरोबरच काही नागरिकांनी लगेच आक्षेप घेतले आहेत. यात नवीन ठिकाणी केंद्राची मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यात केंद्रांची संख्या आणखी वाढली जाऊ शकते. असे सूत्रांचे म्हणणे आहे.

असे आहे चित्र
पूर्वीची मतदान केंद्र संख्या 2400
नव्याने झालेली केंद्रे 168
एकूण मतदान केंद्र संख्या 2568
एकूण मतदार संख्या 23 लाख
2568 केंद्रांवर मनुष्यबळ 12 हजार


कार्यालयात यादी उपलब्ध
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांना आक्षेप घेता यावा यासाठी ती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. नागरिक तेथे आक्षेप-हरकती नोंदवू शकतील, त्यासाठी 23 जुलैची मुदत आहे.
-शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी.