आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निवडणूक तयारी पूर्ण; विभागानुसार दहा केंद्रांवर होणार मतमोजणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका प्रशासनाने २२ तारखेच्या मतदानाची जय्यत तयारी केली असून मतमोजणीचीही तयारी जवळपास पूर्ण केली आहे. काही निवडणूक केंद्रांत मतमोजणीची पुरेशी सोय नसल्याने नवीन मतमोजणी केंद्रे निवडण्यात आली आहेत.
ज्योतीनगर व वेदांतनगर या दोन वॉर्डांत बिनविरोध निवडणुका झाल्याने २२ एप्रिलला १११ वाॅर्डांसाठी मतदान होणार आहे. यंदा दहा निवडणूक केंद्रांत सगळे वॉर्ड विभागण्यात आले असून त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कामे हातावेगळी केली जात आहेत. यंदा प्रथमच दहा ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी ताठे मंगल कार्यालय, मौलाना आझाद संशोधन केंद्र, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, एमजीएमचे बॅडमिंटन कोर्ट, गरवारे स्टेडियम, एन-२ कम्युनिटी सेंटर, सेंट फ्रान्सिस हायस्कूल, शासकीय आयटीआय, यशवंत महाविद्यालय, तुकाराम नाट्यगृह अशी दहा ठिकाणे आहेत.
काही निवडणूक केंद्रांत मतमोजणीची पुरेशी सोय नसल्याने निवडली नवीन केंद्रे

ताठे मंगल कार्यालय, एन-११

हर्सूल, भगतसिंगनगर-म्हसोबानगर, एकतानगर, चेतनानगर-राजनगर, वानखेडेनगर, यादवनगर एन-११, मयूर पार्क, सुरेवाडी, मयूरनगर-सुदर्शननगर, श्रीकृष्णनगर, पवननगर,
शिवनेरी कॉलनी
डॉ. आंबेडकर कला, विज्ञान महाविद्यालय
भीमनगर उत्तर, पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा-भीमनगर दक्षिण, नंदनवन कॉलनी-शांतीपुरा, जयसिंगपुरा, गुलमंडी, भडकल गेट, कोतवालपुरा-गरमपाणी, नागेश्वरवाडी, खडकेश्वर, औरंगपुरा
एमजीएम बॅडमिंटन कोर्ट, सॉल्टसमोर

शहाबाजार, कैसर कॉलनी, नबाबपुरा, राजाबाजार, संजयनगर-जिन्सी, बारी कॉलनी, इंदिरानगर उत्तर- बायजीपुरा, अल्तमश कॉलनी, एन-६ सिडको, आविष्कार कॉलनी, गुलमोहर कॉलनी-सत्यमनगर
गरवारे स्टेडियम
आंबेडकरनगर, मिसारवाडी, आरतीनगर-मिसारवाडी, नारेगाव, एमआयडीसी चिकलठाणा, अयोध्यानगर, गणेशनगर, रहामानिया कॉलनी, किराडपुरा, शरीफ कॉलनी, रोशन गेट.
संत तुकाराम नाट्यगृह

भवानीनगर, संजयनगर, इंदिरानगर दक्षिण-बायजीपुरा, सुराणानगर, विद्यानगर, न्यायनगर, एन-३, एन- ४ पारिजातनगर, राजनगर-मुकुंदनगर, जयभवानीनगर-१३ वी योजना, विश्रांतीनगर, पुंडलिकनगर

सेंट फ्रान्सिस हायस्कूल

गांधीनगर-बापूनगर, अजबनगर, समतानगर, समर्थनगर, कोकणवाडी-कोटला कॉलनी, पदमपुरा, कोकणवाडी, क्रांती चौक, रमानगर, विष्णूनगर, जवाहर कॉलनी

मौलाना आझाद संशोधन केंद्र

रोजाबाग-भारतमातानगर, विश्वासनगर-हर्षनगर, पहाडसिंगपुरा-बेगमपुरा, आरेफ कॉलनी-प्रगती कॉलनी, जयभीमनगर-घाटी परिसर, बुढीलेन-कबाडीपुरा, लोटाकारंजा, चेलीपुरा-काचीवाडा, गणेश कॉलनी, नेहरूनगर, शताब्दीनगर, स्वामी विवेकानंदनगर
आयटीआय, देवगिरी

एकनाथनगर-म्हाडा कॉलनी, कबीरनगर, बन्सीलालनगर, राहुल-सादातनगर, कांचनवाडी-नक्षत्रवाडी, विटखेडा, हमालवाडा-रेल्वेस्टेशन, देवानगरी, मयूरबन कॉलनी

यशवंत कला महाविद्यालय
शिवशंकर कॉलनी-बालाजीनगर, बौद्धनगर-उत्तमनगर, गजानननगर, बाळकृष्णनगर-विजयनगर, गारखेडा-मेहेरनगर, रामकृष्णनगर-काबरानगर, उल्कानगरी, जयविश्वभारती कॉलनी, प्रियदर्शिनी इंदिरानगर, शिवाजीनगर, भारतनगर-शिवाजीनगर
एन-२ कम्युनिटी सेंटर

नारेगाव-ब्रिजवाडी, चौधरी कॉलनी-चिकलठाणा, एन-२ ठाकरेनगर, अंबिकानगर-मुकुंदवाडी, मुकुंदवाडी, ज्ञानेश्वर कॉलनी- मुकुंदवाडी, संजयनगर-मुकुंदवाडी, रामनगर, विठ्ठलनगर, कामगार कॉलनी, चिकलठाणा