आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपोषण टाळण्यासाठी श्रमाचा मोबदला वाढवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात पाच तर ग्रामीण भागात दहा टक्के बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. दारिद्र्य हेच कुपोषणाचे प्रमुख कारण आहे. कुटुंबाच्या गरजा परिपूर्ण होतील, एवढेही उत्पन्न ग्रामीण पालकांना मिळत नसल्यामुळे ही समस्या उदभवल्याचा निष्कर्ष पीएच.डी. संशोधनातून पुढे आला आहे. म्हणून खेड्यातील पालकांना श्रमाचा वाढीव योग्य मोबदला द्यावा, अशी शिफारस गृहशास्त्राच्या संशोधक वंदना बनकर यांनी केली आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या (३ जानेवारी) जयंतीनिमित्त ‘दिव्य मराठी’ने बनकर यांच्या संशोधनातून सामाजिक, शैक्षणिक आढावा घेऊन वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागातील शालेयपूर्व (४ ते वर्षे) मुलांचा आहार दर्जा तपासणे” या विषयावर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली. बनकर सध्या कन्नड तालुक्यातील चिंचोलीच्या धारेश्वर शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात गृहशास्त्राच्या विभागप्रमुख आहेत. आर्थिक विवंचनेमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यांना पूरक आहार दिल्यामुळे कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बाबी ठळकपणे पुढे आल्या आहेत. कुपोषण घालवण्यासाठी माध्यमांचा प्रभावी वापर करणे, १०० % बालविवाह रोखणे, प्रत्येक गावात आरोग्य केंद्र उभारून बालकांची दरमहा तपासणी करणे आणि एकात्मिक बालविकास विभागामार्फत आहार समुपदेशन केंद्र सुरू करणे गरजेचे असल्याचे उपाय त्यांनी सुचवले आहेत. मुलींना कमी आणि मुलांना जास्त आहार देण्याच्या पद्धतीत बदल व्हावा, त्यासाठी भेदभावाच्या भिंती पाडून समानतेसाठी लढण्याची आजही गरज असल्याचे नमूद केले आहे.

चार गावे अन् चार वसाहतींचा समावेश : गंगापूरतालुक्यातील नारायणपूर, फुलंब्रीतील पीरबावडा, कन्ऩडमधील लिंबाजी चिंचोली औरंगाबादमधील आडगाव निपाणी या गावांमधील अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे.

संशोधनातील निष्कर्ष धक्कादायक
>ग्रामीण भागातील ६६ % पालकांनी गरजा पूर्ण होत नसल्याचे, तर शहरातील ३६ % पालकांनी वेतनच पुरत नसल्याचे म्हटले आहे.
>जन्मानंतर उत्तम आरोग्याचे शहरातील प्रमाण ७७. टक्के असून खेड्यात मात्र ७१. टक्के आहे.
>नाष्ट्यात दूध, ब्रेड, बिस्कीट आणि टोस्ट खाण्याचे प्रमाण शहरात ६६ टक्के तर ग्रामीण भागात १८.५ टक्के आहे.
>दूध किंवा दुधाचे पदार्थ जेवण, नाष्ट्यात फक्त शहरातील पालक देतात, ग्रामीण भागातील पालकांचा मात्र याबाबतीत निष्काळजीपणा दिसतो.
>मुलांना पूरक आहार देण्याविषयी ३६ टक्के ग्रामीण पालकांना माहिती आहे, तर शहरात हे प्रमाण ८१. टक्के आहे.
>कुपोषणाच्या प्रथम श्रेणीत शहरी भागातील मुलांचे प्रमाण ६२.५ टक्के तर ग्रामीण भागात ८२ टक्के आहे.