आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी घोषणा करून सहा महिने उलटले; महाराष्ट्र मातृवंदना योजनेच्या प्रतीक्षेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पहिल्यांदा गरोदर राहणाऱ्या मातांना पाच हजार रुपयांची मदत करणारी मातृवंदना योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा महिन्यांपूर्वी जाहीर केली. २०१७ मध्येच ती लागू होईल, असे स्पष्ट केले. केंद्र सरकारने ४ ऑगस्टला अध्यादेश काढला. ४ नोव्हेंबर एक परिपत्रकही जारी केले. मात्र, महाराष्ट्रात अजूनही कार्यवाही झालेली नाही. महिनाभरात अध्यादेश निघेल, असे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.


या योजनेत पहिल्या बाळंतपणासाठी  रुग्णालयात नोंदणी झाल्यावर आणि ६ ते ९ महिन्यादरम्यान प्रत्येकी २ हजार आणि बाळंतपणानंतर १ हजार रुपये असे तीन टप्पे आहेत. शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी झाल्यावर झीरो बॅलन्सवर आयसीआयसीआय बँकेमार्फत खाते काढून रक्कम तिच्याच खात्यावर जमा होणार आहे. भारतात सकस पोषणाअभावी गरोदर माता मृत्यूंचे प्रमाण प्रचंड आहे. म्हणून गर्भारपणात सकस आहार मिळावा, असे उद्देश सांगत मोदींनी आधीच कार्यरत योजना नव्या रूपात जाहीर केली होती.  ती राबवण्याची नियमावली ऑगस्ट २०१७ मध्ये केंद्रातर्फे तयार झाली. त्यानंतर राज्य शासनाने पाठपुरावा केला नसल्याचे समोर आले आहे. तांत्रिक बाबींच्या पडताळणीसाठी विलंब लागल्याचा दावा अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर केला.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, योजना सर्व महिलांसाठी उपयुक्त... 

बातम्या आणखी आहेत...