आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींकडून येणाऱ्या पंधरा लाखांची वाट पाहतोय : राम पुनयानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रात सत्ता दिली की, विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करणार असल्याच्या नरेंद्र मोदी यांच्या वल्गना आता कुठे गेल्या...? मी स्वत: बँकेत पैसे जमा होण्याची प्रतीक्षा करत आहे. अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ विचारवंत राम पुनयानी यांनी केली. खोकडपुऱ्यातील भाकप कार्यालयात रविवारी त्यांचे विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, मोदीच्या सत्तेला १५० दिवस पूर्ण झाले. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी काळा पैसा परत आणण्याचे आशादायी चित्र मतदारांसमोर उभे केले होते. काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या बँक खात्यावर किमान पंधरा लाख रुपये जमा होतील एवढी रक्कम विदेशात आहे. आपण आधी रक्कम परत आणू त्यानंतर प्रत्येक नागरिकांना परत करू, असे प्रलोभन देत मोदी यांनी सत्ता हस्तगत केली अशी टीकाही पुनयानी यांनी केली. इंग्रजांसारख्या देशविघातक शक्तीने ‘डिव्हाइड अँड रूल’ या नीतीचा वापर करून त्यांनी धार्मिक तेढ निर्माण केली. अगदी त्याचप्रमाणे खोटा आणि विकृत इतिहास लिहून शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी आणि औरंगजेब हिंदू विरोधी असल्याचा अपप्रचार करण्यात आला.
या षडयंत्रापासून सावध राहिल्यास देशात हिंदू-मुस्लिम एकता नांदेल असेही त्यांनी म्हटले. माजी नगराध्यक्ष अॅड. अरुण कापडिया, तन्जीम-ए-इन्साफचे प्रदेशाध्यक्ष एस. जी. शुत्तारी, भाकपचे जिल्हासचिव प्रा. राम बाहेती आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. अॅड. मनोहर टाकसाळ, वसंत मुधळवाडकर, सय्यद अली मकसूद अली, देविदास राजळे, संदीप जमधडे, मनीषा भोळे, विकास गायकवाड, अमरजित बाहेती, अतुल बडवे, चंद्रशेखर किरवले, सोनाली नागभिडे, प्रकाश बनसोड, तुकाराम पाटील, रतन गायकवाड, लीला गायकवाड आणि संदीप पेठे आदींची उपस्थित होती. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अॅड. अभय टाकसाळ यांनी केले.