आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला, चांगल्या आरोग्यासाठी देवगिरी सर करूया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज म्हणजेच सीआयआयतर्फे रविवारी फेब्रुवारी रोजी देवगिरी किल्ला चढाई स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी वाजता स्पर्धा सुरू होणार असून हेडगेवार रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अनिल भालेराव यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात येईल. ‘सीआयआय कनेक्ट फॉर हेल्थ’ या थीमनुसार लोकांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले जाईल. विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानांतर्गत किल्ला परिसराची स्वच्छतादेखील करण्यात येणार आहे.

जगात भारतामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ४० दशलक्ष मधुमेहाचे रुग्ण आहेत. हृदयविकार असलेल्या रुग्णांची संख्याही भारतात भरपूर आहे. ती दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित आजार वाढत चालले आहेत. जीवनशैलीतील बदल हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. दुसरी बाब म्हणजे भारतीय लोक व्यायामाकडे दुर्लक्ष करत असल्याने या आजारांचे प्रमाण वाढत आहे. आहाराकडेही बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छता अभियानामध्ये प्रयास, अग्ली औरंगाबादकर आणि सिटिझन रिस्पॉन्स टीम या संस्थांचे सहकार्य लाभणार असल्याचे सीआयआयचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.

यांनासहभागी होता येईल
३५वर्षे वयापर्यंत , ३५ ते ५५ आणि ५५ वर्षांपुढील अशा तीन वयोगटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. त्यात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र गट असतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डेकॅथलॉन स्टोअर, प्रोझोन मॉल, तसेच सीआयआय, हॉझर फ्लोटी इंडिया लिमिटेड, वाळूज आणि सावित्रीबाई फुले एकात्मता मंच, दत्ताजी भाले रक्तपेढी, हेडगेवार रुग्णालय येथे नोंदणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे. सर्वात आधी येणाऱ्या पहिल्या ५०० स्पर्धकांना आयोजकांतर्फे टी-शर्ट देण्यात येतील. सर्व वयोगटातील पहिल्या दोन स्पर्धकांना आकर्षक पुरस्कारही दिले जातील.

आरोग्याबाबत जनजागृती
-औद्योगिक क्षेत्रात मिळणाऱ्या संधी, शिक्षण इत्यादी विषयांवर खूप बोलले जाते, पण आरोग्याबाबत कोणीच बोलत नाही. हे लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. करणार आहोत. प्रशांतदेशपांडे, अध्यक्ष,सीआयआय

मोफत ड्रम्स देणार
-किल्ला परिसरामध्ये वन विभागाने केलेल्या खड्ड्यांमध्ये आम्ही ओला कचरा टाकणार आहोत. तसेच किल्ला परिसरासाठी आम्ही पुरातत्त्व विभागाला कचरा टाकण्यासाठी मोफत ड्रम्सही देणार. सुनीलदेशपांडे, संयोजक,हेल्थ विंग, सीआयआय