आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Walmart Gilve 4000 Youngster Training Aurangabad

वॉलमार्टने वर्षभरात दिले 4000 युवकांना प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रिटेल क्षेत्रात रोजगाराच्या मोठय़ा प्रमाणात संधी असून या क्षेत्रात करिअर करणार्‍या युवकांना वॉलमार्टच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत जवळपास 4000 युवकांना औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पैकी 1506 जणांना या माध्यमातून नोकरीदेखील मिळाली, अशी माहिती भारती वॉलमार्टच्या डीजीएम स्मिता नायर यांनी पत्रकारांना दिली.

रिटेल क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारती वॉलमार्ट ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून युवकांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. दोन आठवड्यांच्या या कोर्समध्ये रिटेल क्षेत्रातील मूलभूत बाबींचे शिक्षण दिले जाते. राज्यात औरंगाबाद आणि जालन्यामध्ये भारती वॉलमार्टची प्रशिक्षण केंद्रे आहेत. 27 एप्रिल 2012 रोजी औरंगाबादला हे केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये गेल्या वर्षभरात औरंगाबादमधून 1894 आणि जालन्यामधून 2115 युवकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण झाल्यानंतर युवकांना प्रमाणपत्र दिले जाते. या प्रशिक्षणात 17 टक्के महिला आहेत. किमान दहावी पास आणि 18 वष्रे वयाची पात्रता आहे. भारतात 18 ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जात असून यामध्ये 6 ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते.

वॉलमार्टच्या वतीने भारतात 27 हजारांवर युवकांना प्रशिक्षित करण्यात आले असून 11 हजार जणांना विविध संस्थांमध्ये रोजगार मिळाल्याचे दीपक पगारे यांनी सांगितले. वॉलमार्ट ट्रेनिंग सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला स्मिता नायर, वॉलमार्ट युनिट हेड पूनम सिंग, आयटीआयचे प्राचार्य सुभाष गोसावी आणि प्रशिक्षक नीरज चिंतावार उपस्थित होते.