आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waluj Aurangabad Mini Bus Stand Maintenance Issue

वाळूज मिनी बसस्थानक बनले कचऱ्याचे आगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूज मिनी बसस्थानकातील बसफेऱ्या बंद झाल्याने त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. परिसरातील व्यावसायिकांसह रहिवासी येथे कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली असून बसस्थानक सध्या कचऱ्याचे आगार बनले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या इमारतीचीदेखील पडझड झाली आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगारांच्या सोयीसाठी पंढरपूर गावालगत पश्चिमेस दोन दशकांपूर्वी वाळूज मिनी बसस्थानक बांधण्यात आले होते. त्या वेळी नियमित बसफेऱ्या सुरू होत्या. मात्र, कालांतराने टप्प्याटप्प्याने बसफेऱ्या कमी होत गेल्या. आता बसस्थानकच बंद झाले. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. लांब पल्ल्याच्या बसेससाठी प्रवाशांना दीड किलोमीटरचे अंतर पार करून नगर-औरंगाबाद महामार्गावरील ितरंगा चौकात येणे भाग पडत आहे.

रस्ता रुंदीकरणात बस थांबे भुईसपाट
नगर-औरंगाबाद महामार्गावरील रहदारी वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर-औरंगाबाद महामार्ग चारपदरी केला. या रुंदीकरणात अडथळा ठरणारे पंढरपूर व वाळूज येथील बस थांबे जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

भाड्याच्या खोलीतून कारभार
राज्य परिवहन महामंडळाने पंढरपूरच्या तिरंगा चौकात एका भाड्याच्या खोलीतून आपला कारभार सुरू केला आहे. तेथे विद्यार्थी पासेसची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र, प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत िनवाऱ्याअभावी ताटकळत उभे राहावे लागत असल्याने गैरसोय होते. त्यासाठी मिनी बसस्थानक पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

दीड किलोमीटर अंतरावर स्थानक
राज्य परिवहन महामंडळाने या बसस्थानकाचा वापर बंद केला आहे. या स्थानकावर बस येत नसल्याने लांब पल्ल्याच्या बसेससाठी प्रवाशांना दीड किलोमीटरचे अंतर पार करून नगर-औरंगाबाद महामार्गावरील तिरंगा चौकात यावे लागते. त्यामुळे प्रवाशांची परवड होत असून हे बसस्थानक पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच बसस्थानकावर सुविधा देण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
पूर्ववैभव मिळावे
लोकसंख्येच्या तुलनेत सध्याची व्यवस्था तोकडी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यासाठी वाळूज मिनी बसस्थानक पूर्ववत सुरू करून त्याला पूर्ववैभव प्राप्त करून द्यावे. शत्रुघ्न िशंदे, रहिवासी

प्रवाशांसाठी केलेला खर्च वाया
एसटी महामंडळाने वाळूज मिनी बसस्थानकावर मोठा खर्च केला. मात्र, कालांतराने त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते अडगळीत पडले आहे. त्यामुळे त्यावरील केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. - गोपाळ विसपुते, रहिवासी