आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या उद्योगनगरीत सेक्स स्कँडल? अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाळूजमधील महिला बेपत्ता होण्यामागे सेक्स रॅकेट असल्याचा दाट संशय आहे. महिलांना आमिष दाखवून गैरमार्गाला लावणे, आपत्तीजनक स्थितीतील चित्रीकरण करणे, त्या आधारावर महिलांना धमकावून पुन्हा पुन्हा त्यांची पिळवणूक करणे, इतकेच नव्हे, तर हे अश्लील व्हिडिओ वेबसाइटवर टाकण्याचे प्रकार उद्योगनगरीत घडत असल्याची तक्रार आहे. तंटामुक्ती समिती या प्रकरणाचा तपास करत आहे. याशिवाय उघड्यावर शौचाला जाणार्‍या महिलांचे व्हिडिओदेखील सार्वजनिक करण्याचा संतापजनक प्रकार डीबी स्टारच्या तपासात उघड झाला आहे.

वाळूज महानगरातून सरासरी पाच दिवसांना एक महिला बेपत्ता होत असल्याचा गौप्यस्फोट डीबी स्टारने यापूर्वी एका विशेष वृत्ताद्वारे केला आहे. महिला बेपत्ता होण्यामागे आर्थिक दुर्बलता, चंगळवाद, लग्न करण्याचे खोटे आश्वासन ही कारणे आहेत. याच गोष्टींचा गैरफायदा घेत महिलांना फूस लावून सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आहे. आपल्या पत्नीचे इतर व्यक्तीबरोबरचे अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर टाकल्याची तक्रार एका व्यक्तीने डीबी स्टारकडे केली. त्यानंतर तपास केला असता महिलांचे बेपत्ता होणे, त्यांचे चित्रीकरण, ठेकेदारांची भूमिका असे प्रकार उघड झालेत. उद्योगनगरीला काळीमा फासणार्‍या या प्रकाराचा तपास करून सत्य उघड करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

असे आहे धक्कादायक प्रकरण
वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणार्‍या सुपरवायझरच्या पत्नीला आर्थिक आमिष दाखवून फूस लावण्यात आली. मोठी रक्कम देऊ, असे सांगून तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. हा संपूर्ण प्रकार छुप्या कॅमेर्‍याने चित्रित केला. त्यानंतर महिलेला पैसे तर दिलेच नाहीत, मात्र चित्रफीत सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिचे पुन्हा पुन्हा शोषण करण्यात आल्याची तक्रार महिलेच्या पतीनेच केली आहे.

वेबसाइटवर अश्लील व्हिडिओ
पत्नीच्या संशयास्पद वर्तनामुळे पतीला संशय आला. अशातच त्याच्या मित्राने व्हिडिओ क्लिप दाखवली. वेबसाइटवरून ही क्लिप लोकांच्या मोबाइलपर्यंत पोहोचल्याने पतीला धक्का बसला. पत्नी मात्र असे काहीही झाले नसल्याचे सांगत आहे; पण व्हिडिओतील महिला आपली पत्नीच असल्याचे तो व्यक्ती सांगतो. आपले कुटुंब उद्ध्वस्त झाले, मात्र इतरांसोबत असा प्रकार घडू नये म्हणून उघडपणे लढा देत असल्याचे तो सांगतो. या प्रकरणाचा तपास करताना वाळूज परिसरातील परिचित अशा अनेक महिलांचे व्हिडिओ वेबसाइटवर असल्याचा त्याचा धक्कादायक दावा आहे.

ठेकेदारांवर संशय
डीबी स्टार चमूने या प्रकरणाचा तपास केला असता दबक्या आवाजात अनेक बाबी पुढे आल्या. अनेक कंपन्यांमध्ये कंत्राटदार कंत्राटी पद्धतीने महिलांची भरती करतात. कमी पगारात घर चालत नसल्याचा अंदाज काही ठेकेदारांना असल्याने ते अशा महिलांना आमिष दाखवतात. त्याला काही महिला बळी पडतात. मात्र, यातून त्यांचे शोषण होणार असल्याचे त्यांना फार उशिरा कळते.

वाळूजच्या अनेक क्लिपिंग ?
वाळूज भागातील 10-12 महिलांच्या क्लिपिंग अपलोड केल्याचा संशय आहे. महिलांना गुंगीचे औषध देऊन, नशा करून हे भयंकर प्रकार केले जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. काही व्हिडिओमध्ये महिला विरोध करत असल्याचे दिसते. मात्र, या महिला वाळूज भागातीलच आहेत का ? याचे रॅकेट काम करत आहे का? काही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असलेले पुरुष कोण? याचा शोध घेण्याचे आव्हान वाळूज पोलिसांपुढे आहे.

फसवण्यासाठी महिलांचाच वापर
डीबी स्टारच्या तपासात समोर आलेली दुसरी बाब म्हणजे, काही ठेकेदारांनी अशा गरजू महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी महिलाच नेमल्या आहेत. या महिलांना भरपूर पैसा दिला जातो. त्यांच्यामार्फत इतर महिलांपर्यंत पोहोचणे सोपे असल्याने हा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पीडित पती-पत्नीचा आरोप आणि बचाव...