आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण विसरलात म्हणून..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज परिसरातील कारखान्यामधून उत्सजिर्त होणार्‍या जल व वायू प्रदूषणावर डीबी स्टारने पाच भागांत अभ्यासपूर्ण मालिका प्रसिद्ध केली होती. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी एक बैठकही घेतली; परंतु खासदार चंद्रकांत खैरे यांनी यात विशेष लक्ष घातले नाही. खासदार चंद्रकांत खैरे यांनी आठ दिवसांत या प्रकरणावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना एकाच व्यासपीठावर बोलावून बैठक घेण्याची घोषणा केली होती; पण दोन महिने झाले तरी आपले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आपण विसरला असाल म्हणून आठवण करून देत आहोत.

21 ते 25 जून या पाच दिवसांत डीबी स्टारने ‘विषारी साम्राज्य’ही मालिका प्रसिद्ध केली. त्यासाठी वाळूज भागात होणार्‍या भूगर्भातील पाण्याच्या चाचण्या घेतल्या. तेथील पाणी पूर्णत: खराब झाल्याचे नमुने हाती आले. या मालिकेत 21 जून रोजी ‘75 हजारांच्या तोंडचे पाणी पळवले.’ या भागात जोगेश्वरी भागातील दूषित झालेल्या तलावाची दुर्दशा प्रथमच समोर आणली.

सहा तारखेला बैठक
लोकसभेचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे बैठक घ्यायचे राहून गेले. 6 तारखेला बैठक घेणार असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनादेखील बोलावणार आहे. डीबी स्टारकडूनही माहिती घेतली जाईल. - खासदार चंद्रकांत खैरे