आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 हजारांपेक्षा जास्त रक्कम नेत असाल तर पोलिसांना कळवा, पोलिसांच्या सूचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाळूज एमआयडीसी परिसरातील बॅग लिफ्टिंगच्या वाढत्या घटना लक्षात घेता या भागात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम घेऊन वावरू नये, अशा सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. अधिकाधिक ऑनलाइन व्यवहारावर भर द्यावा, असा पत्रव्यवहारही पोलिसांकडून करण्यात आला आहे.

 

विशेष म्हणजे काही कारणास्तव ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम घेऊन जायची असल्यास त्याची पोलिसांना माहिती द्या, शुल्क भरून त्यांना पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, असे यादव म्हणाले. मागील १५ दिवसांत या भागात दोन बॅग लिफ्टिंग झाल्या होत्या. त्यानंतर या सूचना काढण्यात आल्या असून पुढील चार दिवसांत आदेशही काढण्यात येणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...