आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - एमआयडीसी वाळूज परिसरातील पाणीपुरवठय़ासाठी आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. 30 वर्षांपूर्वीचे माइल्ड स्टील पाइप (एमएलपी) बाद ठरवून आता डक्टल आयर्न पाइप (डीआयपी) बसवण्यात येत आहेत. त्यामुळे पाण्याच्या गळतीचा प्रश्न कायमचा मिटणार असून यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय टळणार आहे.

मागील 30 वर्षांपूर्वी 700 मिमी व्यासाचे माइल्ड स्टील पाइप (एमएलपी) टाकण्यात आले होते. या पाइपलाइनद्वारे वाळूज एमआयडीसीसह रहिवाशी भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. ही पाइपलाइन ठिकठिकाणी गंजल्यामुळे तसेच मातीच्या संपर्कात असल्यामुळे ती सडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाइप फुटून पाणी गळतीचे प्रमाणही वाढले होते. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे परिसराने तीव्र पाणीटंचाई अनुभवली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याकरिता नागरिक आपल्या सोयीनुसार पाइपलाइन फोडत असल्याचे मत औद्योगिक विकास महामंडळाच्या एका अधिकार्‍याने व्यक्त केले. या सर्व प्रकाराविषयी व नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी ‘दिव्य मराठी’ने अनेकदा सविस्तर वृत्तही प्रकाशित केले.

15 कोटी रुपये होणार खर्च
जुनी पाइपलाइन सडल्यामुळे नवीन डीआयपी पाइपलाइन बसवण्याचे काम सुरू आहे. या पाइपांचा व्यास 700 मिमी असून हे काम सुरू करण्याची परवानगी 14 मे 2013 रोजी मिळाली आहे. या कामावर सुमारे 15 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही पाइपलाइन चार फूट खोलीवर टाकली जात असून 8 किलोमीटरपर्यंत टाकली जात आहे. हे काम 13 मे 2014 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र त्यापूर्वीच ते पूर्ण करण्याचा मनोदय संबंधित एजन्सीने व्यक्त केला आहे.

कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
पूर्वी जमिनीवर पाइपलाइन अंथरण्यात आली होती. पाइपचे मटेरियल माइल्ड स्टीलचे होते. मात्र, आता पाइपलाइन जमिनीत 4 फूट खोलवर टाकली जात आहे. यात डक्टल आयर्नचे टिकाऊ मटेरियल वापरल्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक काळ हे पाइप टिकणार आहेत.

पाइपलाइनचे आयुर्मान 50 वष्रे
डक्टल आयर्न पाइपचे आयुर्मान हे 50 वर्षे राहणार आहे. त्याचा दर्जा अत्यंत चांगला असल्याने ते खराब होणार नाही. त्यातून वेळप्रसंगी पाणी इतरत्र रहिवासी वसाहतींमध्ये वळवता येणे शक्य होणार आहे. त्यात क्रॉस कनेक्शन क रून ठेवले जात आहे. पूर्वीची पाइपलाइन ही उघड्यावर व जमिनीवर असल्याने ती फोडणे सहज शक्य होत होते. मात्र आता ही पाइपलाइन भूमिगत असल्यामुळे पाण्याची चोरी करणे कठीण जाईल.