आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणच्या वाळूज शाखा कार्यालयाचे होणार विभाजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - महावितरणच्या वाळूज शाखा कार्यालयावर असलेला 18 गावांचा भार कमी करण्यासाठी या कार्यालयाच्या विभाजनाचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून त्याला महिन्याभरात मंजुरी मिळेल असे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल. शिवाय, महावितरणच्या महसुलातही वाढ होणार आहे.

गंगापुर तालुकाअंतर्गंत येणारे महावितरणच्या शाखे अंतर्गत ग्राहकांची संख्या 15 हजारांवर गेली. तुलनेत कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना देण्यात येणार्‍या सेवेला र्मयादा येतात. परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कार्यालयाचे विभाजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिणामी, कार्यालयातील कर्मचारी संख्यादेखील वाढणार असल्याने तक्रारींचा तत्क ाळ निपटारा होऊ शकतो.

18 गावांचे कार्यक्षेत्र
वाळूज शाखा कार्यालयांतर्गत परिसरातील सुमारे 18 गावे येतात. त्यात वाळूज, जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजी, पिंपरखेडा, लांझी, नारायणपूर, नायगाव, कमलापूर, शिवराई, हनुमंतगाव, रामराई, मेंदीपूर, केसापुरी, हिरापूर, एकलहेरा, इटावा, परदेसवाडी, वाळूजवाडी या गावांचा समावेश आहे. या 18 गावांमधील कृषिपंप व घरगुती ग्राहक मिळून त्यांची संख्या 15 हजारांवर जाते. त्या तुलनेत कर्मचार्‍यांची संख्या फक्त 18 आहे.

जोगेश्वरी व रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतींची मागणी
साधारणत: 7 हजार ग्राहकसंख्येला एक शाखा कार्यालय, असा शासनाचा नियम आहे. जोगेश्वरी व रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतींनी साधारत: सहा महिन्यांपूर्वी स्वतंत्र निवेदने देऊन महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाला साकडे घातले आहे.

ऊर्जामंत्र्यांनाही मागण्यांचे निवेदन
या कार्यालयाचा अर्धा कार्यभार क ाढून तो स्वतंत्र नव्या शाखा कार्यालयास जोडण्याची मागणी राष्ट्रवादी क ाँग्रेसचे ज्ञानेश्वर नीळ यांनी 8 जुलै रोजी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. मात्र, आजपर्यंत या प्रस्तावावर विचार झालेला नाही. त्यामुळे परिसरातील ग्राहक अडचणीत सापडले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महिनाभरापूर्वीच प्रस्ताव वरिष्ठांकडे
महावितरणच्या वाळूज कार्यालयावर मोठा भार येऊन पडला आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या विभाजनाचा निर्णय झालेला आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी महिनाभरापूर्वी वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्याची मंजुरी येताच कामाला प्रारंभ होणार आहे. सुनील काकडे, कार्यकारी अभियंता, महावितरण

रीडिंगप्रमाणे बिले भरून सहकार्य करावे
ग्राहकांनी महावितरणला पॅरॅमीटर मिळवून देण्यासाठी आकड्यांचा वापर न करता रीतसर आलेली मीटर रीडिंगप्रमाणे बिले भरून सहकार्य करावे. वाळूज कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव महावितरणच्या स्थापत्य विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. साधारणत: महिनाभरात तो मंजूर होऊन येणे अपेक्षित आहे. त्यानंतर रांजणगावात दुसरे शाखा कार्यालय सुरू केले जाणार आहे. आदिनाथ सोनवणे, अधीक्षक अभियंता, महावितरण