आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूरच्या मिनी बसस्थानकाची झाली कचराकुंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- पंढरपूरमध्ये लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले मिनी बसस्थानक बंद असल्याने नागरिकांची परवड होत आहे. तसेच अनेक जण या ठिकाणी कचरा आणून टाकत असल्याने याची अवस्था कचराकुंडीप्रमाणे झाली आहे. त्यामुळे लाखोंचा खर्च करून बांधलेल्या बसस्थानकाची दुरवस्था थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन एमआयडीसी प्रशासनाने पंढरपूर गावाच्या पाठीमागील भागात मिनी बसस्थानक बांधले. या बसस्थानकावर कंट्रोलरची नेमणूक क रून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस या मार्गाने वळवण्यात आल्या, पण वर्षभरात पुन्हा ही बससेवा बंद पडली. आजही ही सेवा बंद असल्याने 67 हजारांवर लोकसंख्या असलेल्या कामगार वसाहतीतील कामगारांची मोठी परवड होत आहे, तर दुसरीकडे बसस्थानकाच्या इमारतीच्या परिसराचा स्वच्छता गृहासारखा वापर केला जात आहे. त्यामुळे परिसरातही दुर्गंधी पसरली आहे. या भागात कचर्‍यांचे ढीग साचल्यामुळे बसस्थानकाला कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे बसस्थानकाची स्वच्छता करून त्याला पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांची सोय व्हावी
सर्वसोयीयुक्त बसस्थानक वारंवार बंद केल्यामळे शासनाचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. या बसस्थानकासाठी पुनर्विचार होणे गरजेचे आहे.
-रघुनाथ ठोंबरे, सिडको, वाळूज महानगर

बसस्थानकावर मासिक पासेसची व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांसाठी सोयीची व चांगली सुविधा होती. मात्र, बसस्थानक बंद पडल्याने आमची गैरसोय होत आहे.
-बाळू आकात, शालेय विद्यार्थी, वाळूज

बसस्थानक सुरू क रण्याचा दोन वेळा प्रयत्न करण्यात आला.मात्र,त्या ठिकाणी प्रवासीच येत नसल्यानेच वाळूजचे मिनी बसस्थानक बंद पडले आहे. अजूनही प्रयत्न करण्याची आमची तयारी आहे, परंतु प्रतिसाद मिळत नाही.
-संजय सुपेकर, विभागीय नियंत्रक, एसटी