आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज टोलनाका दरोड्यातील दरोडेखोराचे रेखाचित्र तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाळूजलगतच्या टोलनाक्यावर दरोडा घालून पसार झालेल्या आठ दरोडेखोरांपैकी एकाचे स्केच (रेखाचित्र) पोलिसांनी तयार केले आहे. पोलिस पाठलाग करत असल्याने दरोडेखोरांनी तवेरा कार सोडून पलायन केले होते. त्यातील एका दरोडेखोरास पिकांमधून जाताना अनेक शेतकर्‍यांनी पाहिले होते. या शेतकर्‍यांच्या मदतीने पोलिसांनी हे स्केच तयार केले असून 26 सप्टेंबर रोजी ते जाहीर करण्यात आले.

सोमवारी (23 सप्टेंबर) पहाटे पावणेपाचच्या सुमारास टोलनाक्यावरील कॅश रूमवर हल्ला क रून 8 सशस्त्र दरोडेखोरांनी कपाटातील रोख 3 लाख 94 हजार 941 रुपये रोख व सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला होता. त्यानंतर दरोडेखोर तवेरा कारमधून पसार झाले होते. पोलिस पाठलाग करत असल्याने दरोडेखोरांनी लासूर नाक्याजवळ तवेरा रस्त्यातच सोडून अंधाराचा फ ायदा घेत पळ काढला. सर्वजण सोबत राहिल्यास संशय येईल या भीतीने दरोडेखोरांनी एक-एक करत रस्ता गाठला. शेतीतून पळावे लागल्याने दरोडेखोरांचे कपडे चिखलाने माखले होते. कपडे चिखलाने माखलेला एक दरोडेखोर लासूर नाक्यापासून निघाल्यानंतर सावंगी-पिंपळगावच्या रस्त्याने भेदरलेल्या स्थितीत जात असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी पाहिले. ही माहिती त्यांनी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांना दिली. त्यांनी या शेतकर्‍यांच्या मदतीने त्या दरोडेखोराचे स्केच तयार करून ते प्रसिद्ध केले आहे. त्यात दरोडेखोराचे नाक जाड असून त्याची दाढी व मिशा वाढलेलेल्या आहेत. केस व डोळे बारीक आहेत. खालचा ओठ जाड आहे. त्याच्या अंगात चौकडीचा शर्ट व बर्मुडा पँट आहे. या दरोडेखोराविषयी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.