आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज : भाजी मंडई की झुडपी जंगल?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - लाखो रुपये खर्च क रून 18 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली वाळूज महानगरातील भाजी मंडई आता जंगलात रूपांतरित झाली आहे. तेथे काटेरी झुडपे वाढल्याने मनुष्यांचा नव्हे, तर जनावरे आणि सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या भाजी मंडईची पुनर्उभारणी करण्याची गरज आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रामुळे बजाजनगर ही सुमारे 70 हजारांवर लोकसंख्या असलेली कामगार वसाहत निर्माण झाली. तेथील रहिवाशांची गरज लक्षात घेऊन सिडको प्रशासनाने वडगाव क ोल्हाटी ते तिसगाव रस्त्याला लागून 18 वर्षांपूर्वी भाजी मंडईची उभारणी केली. 1995 मध्ये दुकाने थाटण्यासाठी स्टॉल उभारण्यात आले. शिवाय, भाजीपाला ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली. भाजीपाला धुण्यासाठी जवळच विंधन विहीरही घेण्यात आली. या सर्व बांधकामावर सिडको प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले.

सर्व सोयींनी युक्त ही भाजी मंडई मात्र भाजी विक्रेत्यांविना ओस पडली आहे. भाजी मंडईचा वापरच होत नसल्याने तेथे वेड्या बाभळींनी विळखा घातला आहे. जनावरे आणि सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर वाढला आहे. सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाजी मंडईवरील खर्च वाया गेला आहे. अडगळीत पडलेल्या भाजी मंडईचा वापर करण्याची मागणी होत आहे. पंढरपुरात औरंगाबाद-नगर महामार्गावर रस्त्याच्या कडेलाच मंडई थाटली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. येथील विक्रेत्यांना हटवून तिसगाव रस्त्यावरील भाजी मंडई येथील गाळे ताब्यात दिल्यास रहदारीचा अडथळा दूर होईल.
स्टॉलचा आकार
भाजी मंडईत 36 स्टॉल आहेत. त्यातील एका स्टॉल साधारणत: 5 बाय 76 स्क्वेअर मीटरचा आहे.

बांधकामानंतर विक्री
1998 मध्ये हे गाळे सिडको प्रशासनाने भाजी विक्रेत्यांसाठी विक्रीस काढले होते.

विक्रेत्यांनी फिरवली पाठ
तयार स्टॉलची त्या वेळी प्रत्येकी 47 हजार 250 रुपये एवढी किंमत ठेवण्यात आली होती. मात्र भाजी विक्रेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली.


संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करा
सिडको प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळेच भाजी मंडईची वाताहत झाली आहे. बांधकामावर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. मंडईच्या दुरवस्थेला क ारणीभूत सिडको प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे. दुर्गासेठ चौहान, सामाजिक कार्यकर्ता, वाळूज महानगर


वाहतुकीचा प्रश्न निकाली निघेल
बजाजनगर वसाहतीत भाजी विक्रेते रस्त्यावरच बसतात. यामुळे रहदारीला मोठा अडथळा होतो. यामुळे छोट्या-मोठय़ा अपघाताच्या घटना घडतात. सिडको प्रशासनाने रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना मंडईतील स्टॉल दिल्यास येथील वाहतुकीचा प्रश्न निकाली निघेल. सोबत भाजी विक्रेत्यांनाही स्टॉल मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होईल. चंद्रशेखर देशमुख, बजाजनगर


दुरुस्ती करून लवकरच निविदा
सिडको प्रशासनाच्या अभ्यास गटाने नुकतीच वाळूज महानगरातील सिडको वसाहतीला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यानुसार आगामी दोन महिन्यांत भाजी मंडईची दुरुस्ती क रून गाळ्यांसाठी टेंडर काढले जाईल. यापूर्वीही तसा प्रयत्न केला गेला. मात्र, त्या वेळी प्रतिसाद मिळाला नव्हता. सुधाकर तेलंग, प्रशासक, सिडको