आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्फ बोर्डाची मनपा आयुक्तांना नोटीस, धार्मिक स्थळांबाबत चर्चा केली नसल्याचा आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- न्यायालयाच्या शासनाच्या निर्णयानुसार शासकीय सरकारी जागेवरील तसेच महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर करणे, नियमित करणे याबाबत महापालिकेने जाहीर प्रगटन दिले होते. मात्र, यामध्ये वक्फ हद्दीतील मशीद, दर्गा, आशुरखाना, चिल्ला, तकिया, कब्रस्तान आदी धार्मिक स्थळांचाही उल्लेख असून याबाबत मनपाने बक्फ बोर्डाशी सल्लामसलत केली नसल्याचा आक्षेप बोर्डाने मनपा आयुक्तांना दिलेल्या नोटिशीत घेतला आहे.

या पत्रात बोर्डाने म्हटले की, वक्फ संस्था मशीद, दर्गा, आशुरखाना, चिल्ला, तकिया, कब्रस्तान इत्यादी मुस्लिम धार्मिक स्थळांचा अधिकृत अभिलेख महसूल कार्यालयात उपलब्ध आहे. जी धार्मिक स्थळे खासगी किंवा वक्फ बोर्ड किंवा धार्मिक संस्थांच्या नावे आहेत, ज्यांना लोकमान्यता आहे अशी धार्मिक स्थळे निष्कासित करू नयेत. जाहीर प्रगटनात नमूद बहुसंख्य धार्मिक स्थळे स्वातंत्र्यापूर्वीची, निझामकालीन आणि मोगलकालीन आहेत. ही धार्मिक स्थळे अनधिकृत धार्मिक स्थळे म्हणून संबोधणे गैरकायदेशीर आहे, असा आक्षेप या नोटिशीत नोंदवण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...