आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धन खून प्रकरणात नाशिकहून येणार विशेष सरकारी वकील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वर्धन खून प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिक येथील विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर येणार आहेत. पोलिस अधिकारी मिसर यांच्याशी चर्चा करत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
 
वर्धन खून प्रकरणातील दोषारोपपत्र तयार झाले असून पुढील आठवढ्यात ते न्यायालयात सादर केले जाणार आहे. अॅड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट तसेच लष्कर- ए- तोयबाकडून नाशकातील आर्टिलरी सेंटरची रेकी करून ते उडवण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणात अबू जिंदाल, हिमायत बेग आणि शेख बिलाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या खटल्यातही मिसर सरकारची बाजू मांडत आहे. सीबीआय आणि एटीएसचे वकील म्हणून मिसर यांची ओळख आहे. या प्रकरणात आरोपी पक्षाकडूनही तीन वकील लावण्यात आले अाहेत. वर्धनचे मारेकरी अभिलाष ऊर्फ अभिराज मोहनपूरकर (२४) आणि श्याम मगरे (२२, दोघेही रा. टिळकनगर) हे दोघेही हर्सूल कारागृहात आहेत.
बातम्या आणखी आहेत...