आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसा दुर्गंधी, रात्री करतो डासांचा सामना, वीस कुटुंबीयांची कहानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक 68, अरिहंतनगरातील नाल्यामुळे बाजूला असलेल्या नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जून महिन्यात मनपाने नाल्याची थातूरमातूर साफसफाई केली. कचरा, प्लास्टिक बॅग काढण्यात आलेल्या नाहीत. गाजर गवतामुळे नाला चोकअप झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नाल्याच्या बाजूला राहणा-या 20 घरांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी वाढल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

मनपाने जून महिन्यात अरिहंतनगर येथील नाला स्वच्छ केला. थातूरमातूर नालेसफाई केल्याने पुन्हा एका महिन्यांच्या आत नाल्यात पुन्हा कचरा, गाजरगवत, कॅरीबॅग जमा झाल्या आहेत. या परिसरात राहणा-या गेल्या सहा महिन्यांपासून दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
मनपा कर्मचारी नाल्यात वेळोवेळी फवारणी करत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. भानुदासनगरपासून निघणारा नाला अरिहंतनगरपर्यंत वाहतो. या ठिकाणी ड्रेनेजलाइनचे पाणी जाण्यासाठी चेंबर बनवले नसल्याने नाल्यातून ड्रेनेजलाइन सोडण्यात आली आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यूसारखे आजार होत आहे. याबाबत मनपा प्रशासनाने दखल घेऊन नाल्याची योग्यरीत्या सफाई करण्यात यावी, वेळोवेळी फवारणी करावी अशी मागणी सुलोचना पगारे, रेवती पगारे, सुशीला गायकवाड, सुमन मोकळे, कमल गायकवाड आदींनी केली.

अरिहंतनगरातील नाल्यात कचरा,गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
मनपाने नाल्याची चांगली सफाई केली नाही. कचरा, प्लास्टिक बॅगा तशाच ठेवल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने घरात पाणी शिरू शकते.
सुमन मोकळे, रहिवासी