आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेत चंद्रकांत कुलकर्णी उलगडणार प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : 'उत्सव जीवनाचा’हे सूत्र असलेली यंदाची सलग दहावी वेध व्यवसाय परिषद रविवारी (८ जानेवारी) सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यादरम्यान होणार आहे.
 
यात प्रतिभावंत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर जडणघडण, त्यांचा जीवनप्रवास, ध्येयनिश्चिती, जिद्द आदी बाबींची सविस्तर माहिती देणार विद्यार्थी, शिक्षक, पालकांना आहेत. प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, लेखक, नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी या मान्यवरांना बोलते करणार आहेत. 
 
व्होकेशनल एज्युकेशन, डायरेक्शन अँड हार्मोनी (वेध) याच्या माध्यमातून जीवनातील विविध अंगांचा परिचय करून देणे हा या परिषदेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. यात संशोधन, चित्रपट, नाट्य, गायन, प्रशासकीय सेवा यासह आगळेवेगळे क्षेत्र निवडून त्यात संघर्ष करून यशस्वी ठरलेल्या मान्यवरांच्या विविध संकल्पना मुलाखतींच्या माध्यमातून मार्मिक आणि नेमकेपणाने मांडणे हे ‘वेध’चे वैशिष्ट्य आहे.औरंगाबादमधील टेंडर केअर होम आणि ठाणे येथील डॉ. आनंद नाडकर्णी संचालित ‘आयपीएच’ यांच्या माध्यमातून हे आयोजन केले जाते. 
 
इथे मिळतील प्रवेशिका : रविवारी सकाळी वाजता परिषदेला प्रारंभ होईल. टेंडर केअर होम, नामधारी फार्म्स, गट नं. ११५, झाल्टा, बीड बायपास रोड किंवा सारडा सेंटर फॉर डायबिटीस अँड सेल्फ केअर, ४, व्यंकटेशनगर, एसएफएस शाळेसमोर, जालना रोड किंवा शालिनी मेडिकल स्टोअर्स, द्वारा पानट हॉस्पिटल, श्रेयनगर येथे प्रवेशिका उपलब्ध असतील. 
 
या मान्यवरांचा सहभाग 
मूळ औरंगाबादकर आणि गेली कित्येक वर्षे मराठी नाट्य, चित्रपट, दूरचित्रवाणी गाजवत असलेले प्रतिभावंत दिग्दर्शक, अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी, काश्मीरमधील हिंसाचारात अनाथ झालेल्या मुलींकरिता कार्य करणारे आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम, भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीच्या खेळाडू देविका वैद्य आणि अनुजा पाटील, चित्रपट अभिनेत्री पूर्वा नीलिमा सुभाष, हलाखीच्या जीवनात संघर्ष करून यश मिळवणारे भिल्ल समाजातील आयएएस अधिकारी राजेंद्र भारूड आणि तरुण यशस्वी आयटी उद्योजक मुक्तक जोशी यांचा वेध व्यवसाय परिषदेत सहभाग असेल. 
बातम्या आणखी आहेत...