आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watchman, CCTV, Senser...But Looted In Aurangabad

सुरक्षा रक्षकाच्या जोडीला सीसीटीव्ही, सेन्सर; तरीही औरंगाबादेत चोरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सुरक्षा रक्षकाच्या जोडीलाच सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर यंत्रणा अशी सगळी अत्याधुनिक यंत्रणा भेदून गजबजलेल्या जालना रोडवरील सेव्हन हिल्स कॉलनीत बंगला फोडून चोरट्यांनी डाव साधला. अनिल ढवळे यांच्या घरी गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 6 लाख 56 हजारांचा ऐवज चोरांनी लुटला. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील रिव्हॉल्व्हरही लंपास केले आहे.


सेव्हन हिल्स कॉलनीतील 40 क्रमांकाच्या बंगल्याचे मालक ढवळे पुणे येथे, तर त्यांचे आई-वडील शहरात राहतात. तीन दिवसांपूर्वीच हे दांपत्य पंढरपूरच्या वारीसाठी गेले आहे. बंगल्याच्या देखाभालीसाठी दोन पाळ्यांत सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पहाटे साडेसहा वाजता सुरक्षारक्षकाला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याने ढवळे यांना माहिती दिली. त्यानंतर जीन्सी ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. ढवळे यांनी 2008 मध्ये खरेदी केलेले रिव्हॉल्व्हरही चोरट्यांनी लंपास केले आहे. परवानगी घेतली होती, परंतु ढवळे यांनी रिव्हॉल्व्हरची काडतुसे खरेदी केलेली नव्हती. सीसीटीव्ही कॅमेरा शर्टने झाकून चोरट्यांनी काम साधले होते. दरम्यान, घरफोड्या करणारे काही चोरटे कारागृहातून बाहेर पडले असून, त्यांच्यातील एखाद्या टोळक्यानेच चोरी केल्याचा संशय गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी व्यक्त केला.


वॉचमन झोपला, सीसीटीव्हीची डिस्क फुल्ल
चोरी झाली तेव्हा वॉचमन खोलीत झोपलेला होता. सीसीटीव्हीच्या डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरची हार्ड डिस्क 2012 मध्ये फुल झाली होती. त्यामुळे कॅमेरे काम करत नव्हते. अशी घटना घडताच घरमालक व जिन्सी पोलिसांना सूचना देणारी बंगल्यातील ‘इन्ट्रूडर अलार्म सिस्टिम’ सुरू केली नव्हती.


अशी सेन्सर सिस्टिम : ‘इन्ट्रूडर अलार्म सिस्टिम’मध्ये घराच्या
मुख्य दरवाजावर सेन्सर बसवण्यात येते. त्यात घरातील व्यक्तींचा किंवा पोलिस ठाण्याचा फोन नंबर सेव्ह केलेला असतो. घराबाहेर जाताना ही यंत्रणा अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर अनोळखी व्यक्ती घरात शिरताच पोलिस व घरमालकाला त्वरित माहिती मिळते.