आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलींच्या वसतिगृहात आठ दिवसांत लागणार तीन कूलर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात येत्या आठ दिवसांत तीन वॉटर कूलर आणि प्युरिफायर बसवण्यात येतील, असे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासमक्ष रात्री पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रार मांडली होती. रात्री 10 नंतर पाणी ठेवत असलेल्या जागेला कुलूप लावले जाते या दाव्याचा व्यवस्थापनाने इन्कार केला आहे.

वसतिगृह हे तीन मजली आहे.
प्रत्येक मजल्यावर एक वॉटर कूलर असावे. तळमजल्यावरील मेसमध्ये एक कूलर आहे. त्यातूनच सर्व मजल्यावरील विद्यार्थिनींना पाणी घ्यावे लागते, अशी परिस्थिती आहे. मेसला लागून मेस चालवणार्‍यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे येणार्‍यांचा वावर वसतिगृहात होऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला बाधा येऊ नये यासाठी कुलूप लावण्यात येते. कुलपाची चावी सुरक्षा रक्षक शेख सिराजोद्दीन यांच्याकडे असते. मुलींना हवे असेल तेव्हा कुलूप उघडून पाणी दिले जात होते. विद्यार्थिनींच्या मागणीनंतरच कुलूप काढून टाकण्यात आले होते, अशी माहिती वसतिगृहाच्या समन्वयक प्रभा बेले यांनी दिली. एक वर्षापूर्वी पहिल्या मजल्यावरही एक कूलर होते, त्यात बिघाडानंतर ते कूलर दुरुस्तीला पाठवण्यात आले, त्यामुळे एकाच कूलरवर तहान भागवावी लागत होती.
मिलिंद दाभाडेंविरुद्ध तक्रार नाही
क्ष किरण विभागाच्या निवासी डॉ. श्वेता गम्हवणेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, चार जूनच्या रात्री काही लोक माझ्याकडे आले. आमचे सिटीस्कॅन आधी करा म्हणून दमदाटी केली. असे प्रकार वारंवार घडू नये आम्हाला सुरक्षा देण्यात यावी. प्रत्यक्षात नगरसेवक मिलिंद दाभाडेंविरुद्ध महिला डॉक्टरने तक्रार केलेली नाही. त्यामुळे प्रशासन त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल करू शकते. याविषयीची माहिती अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांनी दिली.
सुरक्षा हा एकमेव उद्देश
४मुलींच्या वसतिगृहात त्यांना पाणी मिळू नये म्हणून कुलूप लावा, असा आमच्यापैकी कुणाचाही उद्देश नाही. फक्त त्यांच्या सुरक्षिततेत दुर्लक्ष होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले होते, ते देखील त्यांच्या विनंतीनंतर बंद करण्यात आले होते.
प्रभा बेले, समन्वयक, वसतिगृह
(छायाचित्र - हा दरवाजा रात्री 10 वाजता बंद होत असल्याने विद्यार्थिंनींना कूलरकडे जाण्यासाठी पर्याय नसतो. छाया : मनोज पराती)