आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस न आल्यास 4 दिवसांत जायकवाडी मृत साठ्यावर, उद्योगांवर पाणी कपातीचे संकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण/जालना - दमदार सलामी देऊन पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले असून आता औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील चार हजार उद्योगांवरही १५ टक्के पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. पावसाची वक्रदृष्टी कायम राहिल्यास चार दिवसांत जायकवाडी मृत साठ्यावर पोहोचू शकते. परिणामी उद्योगांच्या पाणी कपातीची शक्यता आहे. जायकवाडीत पाणीसाठा एक टक्क्याच्या खाली आला आहे.

बुधवारी उजव्या कालव्यातून गेवराईसाठी ५०० क्युसेकने पाणी सोडले. यामुळे औरंगाबाद, जालन्याला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू शकते. धरणातून औरंगाबादच्या एमआयडीसीला रोज २७६, तर जालन्याला २२ दलघमी पाणीपुरवठा होतो. साठा घटल्याने येथील उद्योगांच्या पाण्यात १५ टक्के कपात होऊ शकते. त्याचा फटका मद्यनिर्मिती कंपन्यांना बसेल. त्याचा फटका मद्यनिर्मिती करणा-या बिअर कंपन्यांसह वाळूज, चिकलठाणा शेंद्रा येथील इतर कंपन्यांना बसणार आहे.

जालन्याला मागणीपेक्षा निम्मेच पाणी
जालना एमआयडीसी टप्पा १ व २ मधील उद्योगांची ४ एमएलडी पाण्याची मागणी आहे. प्रत्यक्षात २ एमएलडी पाणी शेंद्रा एमआयडीसीतून सोडले जाते. जालन्यापर्यंत १.१५ एमएलडीच येते. जालन्याच्या स्टील उद्योगांची पाण्याची मागणी मोठी अाहे. मात्र, पुरेसे पाणी मिळत नसल्याने १०० हून अधिक टॅँकरद्वारे विकत घेतले जाते. एमआयडीसीकडून येणारे १.२५ एमएलडी पाणी हे कामगारांना पिण्यासाठी वापरले जाते.

आधी सिंचन, मग उद्योगांचा नंबर
आठवडाभर पाऊस आला नाही तर आधी सिंचन व त्यानंतर उद्योगांचे पाणी कपात होऊ शकते. सध्याच तसे नियोजन नाही. मात्र, पाणीसाठा १९.६६ दलघमीपर्यंत खाली आला आहे. पावसामुळे तो ५० दलघमीपर्यंत गेला होता. - एस. डी. भर्गोदेव, कार्यकारी अभियंता, कडा