आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आयकर विवरणपत्र अपूर्ण असल्याचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जलसंपदा विभागांतर्गत पैठण येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग आणि औरंगाबाद पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन रखडले आहे. काही लोकांचे आयकर विवरणपत्र आणि ई-सेवापुस्तक अपूर्ण असल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्याची शिक्षा मात्र सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना होत आहे. एका निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाल्यास संबंधित आहरण संवितरण अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, त्याचे पालन येथे केल्याचे दिसत नाही. दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर जी कामे करणे आवश्यक आहेत ती कर्मचारी का करत नाही हा प्रश्न आहे. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगासारखी कारवाई व्हायला हवी. मात्र, सरसकट वेतन थांबवणे योग्य नाही. 

सध्या मार्च एंडिंगमुळे प्रत्येक शासकीय कर्मचारी ताळेबंदच्या कामामध्ये व्यग्र आहे. अशातच वेतन मिळाल्यान ते त्रस्त झाले आहेत. अनेकांनी पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे. हफ्ता दिल्यास भुर्दंड बसणार आहे. याची सर्वाधिक झळ वर्ग संवर्गातील कर्मचाऱ्यांना बसत आहे. 

शासनाच्या वित्त विभागाने २४ मार्च २००९ रोजी याबाबत खास परिपत्रक काढले होतेे. या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेत करणे बंधनकारक आहे. तसेच जलसंपदा विभागानेदेखील अर्थमंत्र्यांच्या २२ जून २०१५ रोजीच्या आदेशानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन प्रदान केल्यास संबंधित कार्यालयाच्या आहरण संवितरण अधिकाऱ्यास जबाबदार धरावे आणि अशा अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, असा आदेश काढला आहे. मात्र, तरीही हे आदेश धाब्यावर बसवून वेतनास विलंब केला जात आहे. असे करून या विभागाने अर्थमंत्र्यांचे आदेशही धाब्यावर वसवले आहेत. 

विभागातील कर्मचाऱ्यांची ई-सेवापुस्तके अपडेट करण्याबाबत २०११ पासून शासन तगादा लावत आहे. पण त्याबाबत ज्या अडचणी आहेत त्यांचे निराकरण करण्यात अधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही. जे काम सहा वर्षात होऊ शकले नाही ते आठ दिवसांत कसे पूर्ण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय सेवापुस्तकाच्या कामाचा ज्यांचा संबंध नाही त्यांचेही वेतन कसे थांबवले हाही प्रश्नच आहे. दुसरे म्हणजे काही कर्मचाऱ्यांनी आयकर विवरणपत्र सादर केलेले नाही. पण त्यांच्याबरोबरच ज्यांनी ते सादर केले त्यांचेही वेतन रोखून धरले आहे. 

अर्थमंत्र्यांचे आदेश बसवले धाब्यावर 
आमच्या विभागातीलकाही कर्मचाऱ्यांची आयकर विवरणपत्रे भरण्याचे काम बाकी होते. ही प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येईल. 
- सी.एल. शिरखेडकर, उपकार्यकारीअभियंता, औरंगाबाद पाटबंधारे विभाग 
बातम्या आणखी आहेत...