आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरिपासाठी पाणीवाटपाचा १७ आॅक्टोबरला फैसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समन्यायीपाणी वाटपाची बैठक १७ ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये घेण्यात येणार आहे. अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद या विभागातील गोदावरी पाटबंधारे महामंडळातील अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ऊर्ध्व भागातील धरणात ९९ टक्क्यांपेक्षा अधिक, तर जायकवाडीत ८२ टक्के साठा झाला आहे. या बैठकीत खरिपाच्या पाण्याचा केलेला वापर आणि त्यानंतर जायकवाडीला पाणी देण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. गेल्या वर्षी समन्यायी पाणीवाटपाच्या वेळी १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या वर्षी जायकवाडी धरणात ८२ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ६५ टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाल्यामुळे पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
जायकवाडीत ८२ टक्के पाणीसाठा : वरचीधरणे शंभर टक्के भरली असली तरी जायकवाडीत शंभर टक्के भरण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे. जायकवाडी धरणात ८२.१८ टक्के साठा झाला आहे. यामध्ये एकूण साठा २५२२ दलघमी, तर उपयुक्त साठा १७८४ दलघमी इतका झाला आहे.

समन्यायी पाणी हवे
^जायकवाडीच्यावरील भागातील धरणे भरली आहेत. त्या भागात खरिपासाठी पाण्याच्या वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ६५ टक्क्यांच्या वर साठा झाल्यास जायकवाडीला पाणी नाही हे सूत्र बदलण्याची गरज आहे. समन्यायी पाणीवाटपही समान व्हावे. वरची धरणे भरली असल्यास जायकवाडीही भरले पाहिजे. शंकरराव नागरे, सदस्य, मराठवाडा विकास मंडळ
बातम्या आणखी आहेत...