आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम डावलून जायकवाडीचे सलग तिसऱ्यांदा पाणी सोडले, सिंचनासाठीच्या पाण्याचा वापर इतरत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून १६ नोव्हेंबरपासून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला पाणी सोडले जात आहे. सलग तिसरी पाणीपाळी सध्या सुरू असून याचा लाभ सिंचनापेक्षा पाणी साठवण्यासाठी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे मात्र जायकवाडीचा पाणीसाठा ८३ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांवर आला आहे. नियमानुसार पाणीपाळी सुरू असताना २१ दिवसांत ७ दिवस कालवा बंद  ठेवावा, असा नियम असताना आज तिसऱ्या पाणीपाळीत या नियमाला हरताळ फासण्याचा प्रकार पश्चिम महाराष्ट्र व जालना-बीडच्या पुढाऱ्यांच्या दबावाने फासला जात असल्याचे समोर आले आहे.  

यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याने ओव्हफ्लोच्या पाण्यावर जायकवाडीचा पाणीसाठा ८३ टक्क्यांच्या वर झाला होता. त्यामुळे चार वर्षांच्या दुष्काळानंतर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीला सात पाणीपाळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मागणी झाल्यावर पाणी देण्यात येणार होते. मात्र नोव्हेंबरमध्ये शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी न येताही १६ नोव्हेंबरला जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्या वेळी मराठवाड्यातील शेतीमधील विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या होत्या व पश्चिम महाराष्ट्रात तर भरपूर पाणीसाठा होता तरीही पाणी सुरू करण्यात आले. ही पहिली पाणीपाळी सुरू असतानाच सलग त्यातच दुसरी पाणीपाळी ७ दिवस कालवा बंद न करताच सुरू ठेवली. यातून शेतीला रोज पाणी लागत नसल्याने कालवा काही दिवस बंद करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला केली. मात्र यात कोणतेही अंतर न ठेवता पाणी सोडायचे म्हणून कालवा सुरू ठेवला गेला. आता तिसरी पाणीपाळी सुरू  आहे.
 
खंड पाहिजेच 
सलग तिसरी पाणीपाळी देणे सुरू असून कालव्यावरील सिंचनाचे क्षेत्र अधिक असल्याने पाणीपाळी सलग सुरू ठेवली. मात्र, २१ दिवसांच्या पाणीपाळीत ७ दिवस पाणी बंद ठेवले पाहिजे असा नियम आहे - अशोक चव्हाण, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...