आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१.२६ कोटीच्या व्हाइट टॉपिंग रस्त्याला तडे, पावसाचे पाणी घरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातीलरस्त्यांची चाळणी झाल्यानंतर महापालिकेने उदार होऊन काही रस्त्यांची कामे हाती घेतली. मात्र, अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याची ओरड होत आहे. सिडको एन-४ परिसरातील गोकुळ स्वीट्स ते होळकर चौक असा कोटी २६ लाख खर्चून सिमेंट रस्ता चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र, रस्त्यावर जागोजाग तडे गेले असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यानंतर "दिव्य मराठी'च्या चमूने या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या तक्रारीत तथ्य आढळून आले असून कामही निकृष्ट झाल्याचे आढळले.
गारखेडा परिसरातील वॉर्ड क्रमांक ८२ भारतनगर, मातोश्रीनगरअंतर्गत येणाऱ्या गोकुळ स्वीट्स ते होळकर चौक या अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम ऑगस्ट महिन्यात सुरू झाले. मात्र, चारच महिन्यांत रस्ता बांधकामाचे पितळ उघड पडले. या रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ट झाल्याची तक्रार नगरसेवक दिग्विजय शेरखाने यांनीही मनपा प्रशासनाकडे केली. महानगरपालिकेने जे. पी. एंटरप्रायझेस या ठेकेदाराकडून रस्त्याचे काम करून घेतले आहे. कोटी २६ लाख रुपयांच्या कामात व्हाइट टॉपिंग रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पावसाचे पाणी जाण्यासाठी साइड ड्रेन, दुभाजकाचे काम करण्याचे प्रस्तावित होते. अजूनही या रस्त्याचे काम अर्धवट असून ९० लाखांचे काम शिल्लक आहे.
काहीदिवसांतच रस्त्याची चाळणी : "दिव्यमराठी'ने केलेल्या पाहणीत रस्ता बांधकामात अनेक उणिवा आढळल्या. रस्त्यावर मातीचे ढिगारे टाकण्यात आले असून पावसाचे पाणी जाण्यासाठी साइड ड्रेनचे कामच करण्यात आले नाही. रस्त्याला जागोजाग भेगा पडल्या आहेत. सपाटीकरणही व्यवस्थित झाले नाही. रस्त्यावरील भेगांची मोजपट्टीने मोजणी केली असता बाय फूट असे रस्त्याला तडे गेले आहेत. चारच महिन्यांत रस्त्याला तडा गेल्यामुळे संपूर्ण कामच नित्कृष्ट झाल्याचे दिसून येते. होळकर चौकाकडे जाताना न्यू रूपेश प्रोव्हिजन दुकानासमोर १० मीटर रुंदीचा तडा गेला आहे. काही दिवसांत रस्त्याची चाळणी होऊ शकते, असे नागरिकांनी सांगितले.
कामाकडे लक्ष दिले नाही

नगरसेवकशेरखाने म्हणाले, या कामासाठी कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्त्याचे काम चालू असतानाच आचारसंहिता लागलेली असल्याने कामाकडे लक्ष देता आले नाही; परंतु मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क होता. हे काम संध्याकाळी करण्यात आले. रस्त्याचे क्युरिंग बरोबरच होत नाही, पाणी कमी पडत असल्याचे तत्कालीन उपअभियंता पी. जी. पवार यांना सांगितले असता त्यांनी संबंधित ठेकेदारांना पत्र काढून याबाबत आदेशित केले होते.
अभियंता म्हणतात हेअर क्रॅक
मनपाचेकार्यकारी अभियंता सिकंदर अली म्हणाले, रस्त्याला तडे गेले असे म्हणता येत नाही. सिमेंट रस्ता करताना तापमान ४० ते ४५ डिग्री असते. यात कमी-जास्त तापमानात सिमेंट रस्त्याला भेगा पडतात; परंतु ते हेअर क्रॅक असते. म्हणजेच रस्त्याच्या खालच्या बाजूला नव्हे, तर वऱ-वर भेगा असतात. रस्ता खचला असता तर पूर्णपणे खराब झाला असता, असे त्यांनी सांगितले. कंत्राटदाराचे पन्नास टक्के पेमेंट बाकी आहे. गोकुळ स्वीट्ससमोर रस्ता संपतो, त्या ठिकाणी खड्डा आहे. त्या ठिकाणी सिमेंट टाकणार असून रस्त्याचे काम अजूनही बाकी असल्याने साइड ड्रेन केले जाईल.