आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणातील पाण्याचा हिशेब देताना अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडीत नेमके पाणी किती, नाशिक ते जायकवाडी या प्रवासात गोदावरीच्या पात्रात नेमके पाणी किती येते, १५६ टीएमसी की १९६ टीएमसी, आदी प्रश्नांच्या भडिमारात गोदावरी जल आराखड्याच्या बैठकीत अधिकारी गांगरून गेले. मराठवाड्यातील पाण्याचा हिशेब आणि चुकीच्या जागी बांधलेली धरणे यांचा नीट ताळेबंद देता आल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले. त्यातच चुकीचा जल आराखडा मंजूर करून घेण्यासाठी अभियंत्यांनी चालवलेल्या खटाटोपावर समिती अध्यक्षांनी आक्षेप घेत अभियंत्यांसह उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. 

गोदावरी खोरे एकात्मिक जल आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने तज्ज्ञांची एक समिती नेमली. त्याची चौदावी बैठक सोमवारी (१७ एप्रिल) वाल्मी संस्थेत के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या दोनदिवसीय बैठकीत जल आराखडा मंजूर करण्यावर चर्चा होणार आहे. १० एप्रिल २०१७ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्य सचिवांनी समिती अध्यक्षांसह सदस्यांना गोदावरी जल आराखडा अंतिम करण्यासंबंधी बैठक घेण्याचे आदेशित केले होते. 

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला आराखडाच योग्य असल्याचे सांगून विषयाला सुरुवात केली. मात्र उपस्थित सदस्यांनी त्यावर आक्षेप घेत गोंधळ घातल्याने बैठक थांबली. दरम्यान, निवृत्त अधिकाऱ्यामार्फत तयार केलेल्या आराखड्यात ४० विभागांकडून अद्ययावत माहिती घेता मिळेल ती माहिती टाकून तीच योग्य असल्याचे दाखवल्याने चौदाशेवर आक्षेप आले आहेत. 

दुपारी सुरू झालेल्या बैठकीत अध्यक्षांसह सदस्यांनी जायकवाडी धरणातील पाण्याचा हिशेबच जुळत नसेल तर निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनी तयार केलेला जल आराखडा खरा मानायचा कसा, असा सवाल केला. 

ताळमेळच लागेना...
मध्य गोदावरी उपखोरे म्हणजे जायकवाडी ते नांदेडपर्यंतच्या खोऱ्यात १०२ टीएमसी पाणी आणि त्यावर किती प्रकल्प आहेत, याशिवाय जायकवाडी धरणातील १९६.५० की १५७.२० टीएमसी पाणी याचा ताळमेळच अधिकाऱ्यांनी दिला नाही. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आजच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. 
बातम्या आणखी आहेत...