आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद: नव्या आयुक्तांच्या आदेशावरही फेरले पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पाणी वाचवण्याचे व नासाडी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, पण फरक पडला नाही. त्यानंतर नवीन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनीही पाण्याच्या नासाडीवर कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी खास दक्षता पथकही स्थापन केले आहे; परंतु त्यांच्या आदेशावरही पाणी फेरले जात आहे. त्यामुळेच एकीकडे तहानलेली जनता पाणी पाणी करत असताना दुसरीकडे शहरभरात पाण्याचे लोट वाहत नासाडी होत आहे. याला मनपाच्या बेजबाबदार कारभाराबरोबरच जनताही तेवढीच कारणीभूत आहे.

मनपा जाहिरात देऊन जनजागृती करत आहे. घरे, ओटा व आंगण धुण्यात पाणी वाया घालणे, वाहने धुणे, नळांना तोटी न लावता पाणी रस्त्यावर सोडणे, रस्त्यावर बसून नळीद्वारे कपडे धुणे, बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणे आदी गोष्टी करणार्‍यांना दंड आकारण्याचा इशाराच या जाहिरातीव्दारे देण्यात आला आहे. मात्र, सिडको-हडको परिसरात लोक बिनधास्तपणे या गोष्टींचा भंग करत असल्याचे डीबी स्टार आज उघड करत आहे.