आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी संघर्ष समिती आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात समन्यायी पाणीवाटप झालेच पाहिजे, या मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समितीतील सदस्य आक्रामक झाले होते. त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. 20 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात जिल्हानिहाय बैठक घेण्यात येणार असून 24 ऑगस्टला मेळावा होईल, असे समितीचे सदस्य प्रदीप पुरंदरे यांनी सांगितले.

पाणीवाटपासंदर्भात आतापर्यंत दोन वेळा मेंढेगिरी समिती नेमण्यात आली. मात्र समितीच्या अहवालावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी निदर्शने करण्यात आली. सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कालव्याच्या माध्यमातून पाणी वळवण्याच्या घटनेचा निषेध केला.

राज्यपालांना साकडे
राज्य सरकार दुटप्पी वागत असल्यामुळे समितीच्या वतीने थेट राज्यपालांनाच साकडे घालण्यात आले आहे. ऊर्ध्व गोदावरी नदी खो-यातील धरणातून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्याबाबत कायदा असूनही त्याबाबत गोंधळ कायम आहे. मजनिप्रच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राज्यपालांनी केली. त्यामुळे राज्यपालांनी या संस्थेच्या कामाची झाडाझडती घ्यावी, अशी मागणी समितीने राज्यपालांना पत्राद्वारे केली. भालचंद्र कांगो, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, उद्धव भवलकर, सुभेदार बन, दिनकर बोरीकर, शरद अदवंत, भीमराव बनसोड, पंडित मुंडे, आसाराम लहाने पाटील उपस्थित होते.