आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाष्पीभवनाचे प्रमाण कपातीच्या ५०० पट ! तीन महिने लागणाऱ्या पाण्याची एका दिवसातच वाफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बिअर कंपन्यांच्या दैनंदिन वापरापैकी ४५ टक्के पाणी कपातीचा फॉर्म्युला प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या सर्व कपातीच्या माध्यमातून जवळपास दोन एमएलडी पाण्याची बचत होणार असली तरी हे पाणी जायकवाडीच्या कालव्यातून सोडणे शक्य नाही. कपातीत केलेल्या पाण्याच्या ५०० पट साठ्याचे दररोज बाष्पीभवन होत असून सर्व कंपन्या बंद केल्या तरी त्या कंपन्यांना लागणाऱ्या पाण्याचे अवघ्या अर्ध्या दिवसात बाष्पीभवन होईल, अशी प्रतिक्रिया सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी नोंदवली.

जायकवाडी धरणात सध्या ६०५ दलघमी पाणीसाठा आहे. जायकवाडीच्या मृतसाठ्यातून ३८५ दलघमी पाणी उचलण्याचे नियोजन असून आतापर्यंत १३३ दलघमी पाणीसाठा उचलण्यात आला आहे. यापैकी २५२ दलघमी पाणी अजून उचलण्याचे नियोजन कडा विभागाच्या वतीने करण्यात आलेे आहे.

एकलाख टँकर भरणे शक्य :
सिंचनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज जायकवाडीतील एक दलघमी (एक हजार एमएलडी) पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. कडाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनानुसार अजूनही २५२ दलघमी पाणी उचलता येणे शक्य आहे. यापैकी एक दलघमी पाणी टँकर भरण्यासाठी दिले तरी दहा हजार लिटरचे साधारणत: एक लाख टँकर या माध्यमातून भरणे शक्य आहे. एक एमएलडी (१० लाख लिटर) पाण्याने १० हजार लिटर क्षमतेचे १०० टँकर भरता येतील. त्यानुसार एक दलघमी (एक हजार एमएलडी) पाण्याने एक लाख टँकर भरता येतील. त्यामुळे दुष्काळी भागात पाणी द्यायचे असल्यास टँकरच्या माध्यमातून हा पुरवठा करता येणे शक्य आहे. सध्या वाचणारे हे पाणी अपव्ययामुळे जायकवाडीच्या कालव्यातून सोडणे शक्य नसल्यामुळे दुष्काळी भागाला देता येणार नाही. सध्या एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून ४०० टँकर भरले जात असून आगामी काळात ८०० टँकर भरण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
सद्यस्थिती अशी
४.१४ एमएलडी- मद्यनिर्मिती कंपन्यांचा यापूर्वीचा पाणीपुरवठा
३.३१एमएलडी- २०टक्केकपातीनंतरचा पाणीपुरवठा
०.६३एमएलडी- आणखी १५टक्केकपातीनंतर वाचणारे पाणी
उद्देश साध्य होत नाही
या कपातीमुळे दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचेल अशी स्थिती आज नाही. याउलट जितका जास्त पाणीसाठा असेल तितके बाष्पीभवनही वाढेल. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही वाढणार आहे. त्यामुळे कपातीचा उद्देश साध्य होत नाही. याउलट शहरात पाणी नाही असाच संदेश उद्योग क्षेत्रात जात आहे. आशिष गर्दे, अध्यक्ष,सीएमआयए

मद्यनिर्मिती कंपन्यांना ४.१४ एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. त्यात २० टक्के कपात केल्यानंतर या कंपन्यांना ३.३१ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. आता पंधरा दिवसांआड पाच टक्के अशी टप्प्याटप्प्याने १५ टक्के कपात केली तर शून्य दशांश ६३ एमएलडी (०.६३ एमएलडी) पाणी वाचणार आहे. सध्या एक दलघमी पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत असून हे प्रमाण पाणी कपातीच्या ५०० पट आहे. या सर्व कंपन्यांना पुरवले जाणारे चार एमएलडी पाणी आगामी तीन महिने बंद केले तरी ३६० एमएलडी पाणी वाचवले जाऊ शकेल, परंतु एक हजार एमएलडी साठ्याचे बाष्पीभवन होणार असल्यामुळे तीन महिने लागणाऱ्या पाण्याची एका दिवसातच वाफ होणार आहे.

लेखाजोखा
६०५ दलघमीसाठा सध्या जायकवाडीत
३८५ दलघमीपाणी मृतसाठ्यातून उचलण्याचे नियोजन
१३३ दलघमीपाणी आत्तापर्यंत उचलले
२५२ दलघमीपाणी अजूनही उचलता येणे शक्य
०१ दलघमीदररोज पाण्याचे बाष्भीभवन
४०० टँकरएमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून भरले जातात
८०० टँकरआगामी काळात भरण्याचे प्रशासनाचे नियोजन